PCMC: कष्टकरी कामगार ७०० पुरुष, महिलांना पोशाख व मिठाई वाटप


पिंपरी, प्रतिनिधी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
समाजातील श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी अंध अपंग हॅंडीकॅप बंधू भगिनी अशा कामगारांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची दिवाळी, नंतर पाहू आपली’ या भूमिकेतून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नियोजन समिती’ आणि छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या वतीने सफाई कर्मचारी, पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना पोशाख व मिठाई, घरकाम करणाऱ्या महिलांना साडी आणि मिठाई वाटप वाटप करण्यात आली.
पिंपळे गुरव पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी, महापालिकेचे सफाई कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, घंटागाडीवर काम करणाऱ्या ७०० पुरुष व महिला आदी सर्वांना साडी, कपडे व मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, युवराज माने, अभिमन्यू पवार, प्रकाश इंगोले, अण्णा जोगदंड संतोष भोरे, अण्णा मोरे, सूर्यकांत कुरुलकर, बळीराम माळी, सखाराम वालकोळी, अनिताताई पांचाळ , वामन भरगंडे, अनिसभाई पठाण, संजय सूर्यवंशी, संदीप कोराळे, दिनेश पवार, कॅप्टन बालाजी पांचाळ, बाळासाहेब काकडे, प्रवीण कदम, शंकर तांबे, किशोर आटरगेकर आदी उपस्थित होते. याबाबत धनाजी येळकर यांनी सांगितले, की आपल्या माणसांसाठी वर्षातील सर्वात मोठा आनंद वाटता येणारा सण दिवाळी आहे. छावा संघटना विविध घटकांना सोबत घेऊन नेहमीच दिशादर्शक आणि सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवत आहे. प्रथम कष्टकऱ्यांची दिवाळी साजरी झाली पाहिजे, या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.