शिवप्रतिष्ठान संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भिडे यांच्याविरोधात 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होतागुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्या सुनावणीला भिडे गैहजर, यामुळे जारी केले वॉरंट
कोल्हापूर – शिवप्रतिष्ठान हिदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या विरोधात बेळगावमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. बेळगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाने हे आदेश दिले आहे. गेल्यावर्षी 13 एप्रिल 2018 रोजी भिडे यांनी आचारसंहितेचा भंग केल्यामुळे बेळगाव ग्रामीण पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत एकाही सुनावणीला भिडे हजर न राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केला होता आचारसंहितेचा भंग
गेल्यावर्षी बेळगाव जवळील येळ्ळूर गावात महाराष्ट्र मैदानावर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संभीजी भिडे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे विधान केले होते. या विधानामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.