पुन्हा ”मोगलाई” येऊ शकते-BJP खासदार तेजस्वी/”चिंता करू नका आम्ही उदारमतवादी तुम्हाला वाचवू”-जावेद

सोशल मीडियावर भाजपचे तरुण खासदार तेजस्वी आणि जावेद अख्तर यांच्यात जुंपली.
बॉलिवूड डेस्कः जावेद अख्तर सोशल मीडियावर खूप सक्रिय राहतात. ते सामाजिक आणि राजकीय मुद्दयांवर नेहमी आपल्या प्रतिक्रिया देत असतात. आताच ते भारतीय जनता पक्षाचे युवा खासदार तेजस्वी सूर्यांच्या एका ट्विटवर प्रतिक्रिया दिली. तेजस्वी यांनी लोकसभा बजेटदरम्यान राष्ट्रपतींच्या भाषणावर चर्चा करताना एनआरसी आणि सीएएच्या विरुद्ध शाहीन बागमध्ये होत असलेल्या आंदोलनाबाबत टीका केली. ते म्हणाले, मोगलाई पुन्हा येऊ शकते म्हणून बहुसंख्याक समाजाला सावध राहण्याची गरज आहे. तेजस्वी सूर्याच्या या वक्तव्याबद्दल गीतकार जावेद अख्तर यांनी सडेतोड उत्तर दिले.
- जावेद म्हणाले – आम्ही वाचवू
जावेद यांनी कमेंटमधून आपल्या प्रतिक्रियेत लिहिले. ‘जर तुम्ही मोगलाईबाबत इतके भयभीत झाले आहात तर मी अंदाजही लावू शकत नाही की, तुम्ही एटीला द हन आणि इन्वेजन ऑफ वाइकिंग्सला घेऊन किती घाबरला असाल. चिंता करू नका, आम्ही उदारमतवादी तुम्हाला वाचवू.’
- तेजस्वी सूर्या यांनी दिले प्रतिउत्तर
जावेद यांच्या या ट्विटवर तेजस्वी सूर्या यांनी उत्तर दिले. त्यांनी लिहिले, ‘जावेदजी, देव न करो जर मोगलाई पुन्हा आली तर उदारमतवाद्यांना सर्वांत पहिले फाशीवर चढवले जाईल. तथािप तुम्ही वाचाल. कारण तुम्ही त्यांचाच धर्माचे आहात.’
उल्लेखनीय म्हणजे ज्या काळात क्रूर बंजाऱ्यांनी युरोप आणि स्कँडिनेव्हिया देशातील अनेक भागांमध्ये अत्याचार करत आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली होती असाच काळ वाइकिंग्स एज इतिहासातही पाहायला मिळतो. तेजस्वी सूर्या लोकसभेत म्हणाले होते, बहुसंख्याक समाज गाफिल राहिला तर मोगलाई दूर नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी एकच गोंधळ केला. सोबतच त्यांच्या ट्विटवरही अनेक युजर्सनी त्यांना ट्रोल केले.
बाॅलिवूडबाबत बोलावयाचे झाल्यास सीएए-एनआरसी कायद्यावरून जावेद अख्तरांसह अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज, सुधीर मिश्रा, जोया अख्तर, फरहान अख्तर, तापसी पन्नू, ऋचा चड्डा, अली फजल, अनुभव सिन्हा आदी अनेक सिनेतारे या कायद्याच्या विरोधात आहेत. हे सर्व जण कायम या संदर्भात ट्विट करत राहतात.