Election 2024: मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार….


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे. ‘मित्र पक्षांची यादी आली नाही, तर एका जातीवर निवडणूक लढवणं अशक्य आहे. ही आमची माघार नाहीतर हा गनिमी कावा आहे’, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर आंदोलन अद्याप संपलं नसून ते सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत एक मोठी घोषणा केली आहे. यामध्ये ते असे म्हणाले, ‘एका जातीवर निवडणूक लढणं शक्य नाही, त्यामुळे मराठा उमेदवारांनी अर्ज काढून घ्यावेत. मित्र पक्षांची यादी आली नाही, अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने माघार घेतोय. तर या निवडणुकीत कोणाला पाडाही म्हणणार नाही आणि कुणाला निवडून आणा असंही म्हणणार नाही.’, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले तर कोणत्याही अपक्षाला आम्ही पाठिंबा दिलेला नाही, कोणत्याच जागेवर आमचा पाठिंबा नाही. कोणत्याही दबावापोटी मी हा निर्णय घेतलेला नाही,
शरद पवार: एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. माझं एवढं राजकीय आकलन आहे. एवढ्या ताकदवान पक्षांनाही एकत्र यावं लागलं. राजकीय प्रक्रिया हाताळणं ही साधी गोष्ट नाही. मी तर या राजकीय प्रकरणात लेकरू आहे. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातं. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. महाविकास आघाडीचा दबाव होता म्हणून मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याची टीका महायुतीच्या नेत्यांनी केली. या टीकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना जरांगे यांचं कौतुक केलं आहे. मी जरांगे यांनी जो निर्णय घेतला त्याचे स्वागत करतो. देर आये दुरुस्त आये. एका समाजावर निवडणूक लढविणे शक्य नाही. इतर समाज साथ देत नाही. आता मराठा समाज मोकळेपणाने निवडणुकीत भाग घेईल. सर्वच पक्षाने जे उमेदवार दिले आहेत, त्यात 60 ते 70 टक्के मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांचा निर्णय अतिशय योग्य आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.