चिंचवड विधानसभा मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हे विजयी…


चिंचवड : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) चिंचवड विधानसभा मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हे विजयी झाले आहेत. विजयानंतर जगताप यांनी महायुतीच्या नेत्यांचे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांमधील कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. केवळ अमोल कोल्हे यांच्या हट्टपायी चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचा आरोप शंकर जगताप यांनी केला आहे. शंकर जगताप हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. शंकर जगताप म्हणाले, हा विजय चिंचवड मतदारसंघातील जनतेचा आहे. हा विजय दिवंगत लक्ष्मण जगताप यांना समर्पित करतो. माझ्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेतले आहे. पुढे ते म्हणाले, आयत उमेदवार दिल्याने शरद पवारांच्या पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आहे