26 वी ऑल इंडिया कुमार सुरेद्रसिंग इंटर स्कूल शुटींग चॅम्पियनशीप- 2024 मध्ये पिंपरी-चिंचवडचा सुपुत्र शंतनु शेखर लांडगे याने प्रथम क्रमांक पटकावला


पिंपरी : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
निगडी, पिंपरी-चिंचवड येथील ज्ञानप्रबोधिनी या प्रतिष्ठीत शाळेत इयत्ता १० वीच्या वर्गात शंतनू शिकत आहे. याच ठिकाणी तो नेमबाजीचे धडे गिरवत आहे. प्रशिक्षक फुलचंद बांगर आणि प्रजक्ता गाडे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे.नालंदा, बिहार येथे झालेल्या 26 वी ऑल इंडिया कुमार सुरेद्रसिंग इंटर स्कूल शुटींग चॅम्पियनशीप- 2024 मध्ये पिंपरी-चिंचवडचा सुपुत्र शंतनु शेखर लांडगे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. १० मीटर रायफल स्पर्धेत त्याने ६२४.२ गुण मिळवत त्याने आपल्या गटात विजेतेपदक पटकावले आहेयापूर्वी, राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारतीय नेमबाजी संघाच्या सराव चाचणीसाठी त्याची नियुक्ती झाली होती. पिंपरी-चिंचवड शहरात इंटरस्कूल स्पर्धेत शंतनू याने सलग दोन वर्षे विजेतेपदक मिळवले आहे.