पोलिस भरती करण्याचे आमिष दाखवून शारिरीक संबंध प्रस्थापित


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केला. पोलीस भरतीबाबत विचारणा केली असता तिला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, तिला मारहाण देखील केली. आरोपीच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रियांका गोरे तपास करत आहेत.
शिक्षणानिमित्त पुण्यात आल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला पोलीस भरती करण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (आंबेगाव पोलीस ठाणे) तक्रार दिली आहे
. त्यानूसार, राजू पंधारे (वय ४८, रा. भारती विद्यापीठ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा सैनिक कल्याण विभाग अशी संस्था चालविली जाते. या नोंदणीकृत संस्थेत राजू पंधारे हा क्लर्क म्हणून काम करत होता. याठिकाणी तरुणी पोलीस भरतीच्या तयारीसाठी जात होती. गेल्या चार वर्षापुर्वी त्यांची ओळख झाली होती. ओळखीनंतर राजू याने तरुणीला पोलीस दलात भरती करण्याचे आमिष दाखविले.