शंकर जगताप आणि महेश लांडगे या दोघांपैकी एकाला मंत्रीपद द्यायला हवं…


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी तीन विधानसभा येतात. लोकसभा निवडणुकीला इथे महायुतीच्या उमेदवारांना चिंचवडमधून ७६ हजारांची आघाडी दिली. पिंपरी मधून १६ हजार मतांची आघाडी दिली. भोसरीमधून ९ हजार मताच आघाडी दिली आणि त्यानंतर इथं शंकर जगताप अध्यक्ष झाल्यानंतर जी स्मूथ लेवलला किंवा खालच्या स्तरापर्यंत बुथस्तरावर शक्ति केंद्र मंडळ आणि संघटनात्मक जी ताकद वाढली ती लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आली. त्यामुळे शहराला यंदा मंत्रिपद देण्याची मागणी शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.राज्यातील हिवाळी अधिवेशनाला १६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरूवात होणार आहे, त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधी नंतर आता मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागावी यासाठी लॉबिंग सुरु झाल्याचे चित्र आहे. यासाठी आता पिंपरी चिंचवड भाजपने दबाव आणायला सुरुवात केली आहे.शहराला मंत्रीपद मिळावे यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट विधानसभेचा लेखाजोखा मांडला आहे. त्याचबरोबर आजवर शहराला न मिळालेले मंत्रीपद यंदा मिळायला हवेच अशी आग्रही भूमिका शहर भाजपने घेतली आहे. राज्यातील २८५ मतदारसंघाच्या तुलनेत पिंपरी, चिंचवड आणि भोसरीत आम्ही बूथ लेव्हल वर सर्वोत्तम कामगिरी केली आहे. याचा लेखाजोखा पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडला आहे. ही कामगिरी पाहता शंकर जगताप (Shankar Jagtap) आणि महेश लांडगे (Mahesh Landge) या दोघांपैकी एकाला मंत्रीपद द्यायला हवं, अशी दबावाची खेळी शहर भाजपने खेळली आहे