39 आमदारांनी घेतली ”मंत्रिपदाची” शपथ


नागपूर (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना). राज्यात महायुतीने २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकल्या. तर, महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मानावं लागलं. एवढ्या प्रचंड प्रमाणात यश मिळवूनही महायुतीला सत्तास्थापनेसाठी १२ दिवस लागले नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा विस्तार झाला आणि ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
. तर मंत्रिमंडळ विस्तार करायला आणखी १२ दिवस असे मिळून एकूण २४ दिवस लागले. अखेर आज (१५ डिसेंबर)
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आता भाजपाच्या २० शिवसेनेच्या (शिंदे) १२ व राष्ट्रवादीच्या (९) मंत्र्यांचा समावेश आहे.नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विानसभा निवडणुकीत भाजपाने १३२, शिवसेनेने (शिंदे) ५७ तर राष्ट्रवादीने (अजित पवार) ४१ जागा जिंकल्या आहेत
. विजयी आमदारांच्या संख्येनुसार मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या (शिंदे) आठ आमदारांनी कॅबिटने मंत्रिपदाची शपथ घेतली असून यामध्ये गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शभूराज देसाई, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर व संजय शिरसाट यांचा समावेश आहे. तर, रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल व योगेश कदम यांनी राज्यमंत्रीपदाची शपध घेतली आहे यासह
भाजपाच्या २० मंत्र्यांची यादी
क्र. | मंत्र्याचं नाव | मंत्रीपद |
1 | देवेंद्र फडणवीस | मुख्यमंत्री |
2 | चंद्रकांत पाटील | कॅबिनेट मंत्री |
3 | मंगलप्रभात लोढा | कॅबिनेट मंत्री |
4 | राधाकृष्ण विखे पाटील | कॅबिनेट मंत्री |
5 | पंकजा मुंडे | कॅबिनेट मंत्री |
6 | गिरीश महाजन | कॅबिनेट मंत्री |
7 | गणेश नाईक | कॅबिनेट मंत्री |
8 | चंद्रशेखर बावनकुळे | कॅबिनेट मंत्री |
9 | आशिष शेलार | कॅबिनेट मंत्री |
10 | अतुल सावे | कॅबिनेट मंत्री |
11 | संजय सावकारे | कॅबिनेट मंत्री |
12 | अशोक उईके | कॅबिनेट मंत्री |
13 | आकाश फुंडकर | कॅबिनेट मंत्री |
14 | जयकुमार गोरे | कॅबिनेट मंत्री |
15 | शिवेंद्रराजे भोसले | कॅबिनेट मंत्री |
16 | नितेश राणे | कॅबिनेट मंत्री |
17 | जयकुमार रावल | कॅबिनेट मंत्री |
18 | माधुरी मिसाळ | राज्यमंत्री |
19 | मेघना बोर्डीकर | राज्यमंत्री |
20 | पंकज भोयर | राज्यमंत्री |
महिला आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली?
भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून आमदार आदिती तटकरे यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच भाजपाकडून आमदार माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तसेच भाजपाकडून आमदार मेघना बोर्डीकर यांनी देखील राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीपार्टीमधील नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली .राष्ट्रवादीच्या (अजित पवार) कोणत्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली?
- हसन मुश्रीफ
- धनंजय मुंडे
- हसन मुश्रीफ
- दत्तात्रय भरणे
- आदिती तटकरे
- माणिकराव कोकाटे
- नरहरी झिरवाळ
- मकरंद जाधव
- इंद्रनील नाईक
- माणिकराव कोकाटे

शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी
क्र. | मंत्र्याचं नाव | मंत्रीपद |
१. | एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री |
२. | गुलाबराव पाटील | कॅबिनेट मंत्री |
३. | दादा भूसे | कॅबिनेट मंत्री |
४. | संजय राठोड | कॅबिनेट मंत्री |
५. | उदय सामंत | कॅबिनेट मंत्री |
६. | शंभूराज देसाई | कॅबिनेट मंत्री |
७. | संजय शिरसाट | कॅबिनेट मंत्री |
८. | प्रताप सरनराईक | कॅबिनेट मंत्री |
९. | भरत गोगावले | कॅबिनेट मंत्री |
१०. | प्रकाश आबिटकर | कॅबिनेट मंत्री |
११. | आशिष जैस्वाल | राज्यमंत्री |
१२. | योगेश कदम | राज्यमंत्री |