भूगोल दिनानिमित्त ‘जीविधा’ तर्फे यंग अचिव्हर पुरस्कार


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
‘जीविधा ‘या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थेमार्फत भूगोल दिनानिमित्त ‘यंग अचिव्हर पुरस्कार’ प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या क्षेत्रातील योगदानाबद्दल तरूण अभ्यासक डाॅ. श्रीकांत गबाले,तरूण भूवैज्ञानिक हार्दिक संकलेचा यांना ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ.संजीव नलावडे यांच्याहस्ते गौरविण्यात येणार आहे.शनिवार, दि.१८ जानेवारी रोजी प्र.ल.गावडे सभागृह,पेरूगेट भावे हायस्कूल (सदाशिव पेठ) येथे सायंकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ डॉ.संजीव नलावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर डॉ.श्रीकांत गबाले यांचे ‘पुण्यातील नद्या व ओढे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.हा कार्यक्रम सर्वासाठी मोफत खुला आहे.’जीविधा’च्या वतीने राजीव पंडित,वृंदा पंडित यांनी ही माहिती दिली.