पथारी विक्रेत्यांच्या हक्कांसाठी ‘हल्ला बोल’ आंदोलन

पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)-

पथारी विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) आणि जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता पुणे महानगरपालिकेच्या गेटवर ‘हल्ला बोल’ आंदोलन आयोजित करण्यात आले

.या आंदोलनात जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाचे अध्यक्ष संजय आल्हाट,,कन्हैया पाटोळे,कल्पना जावळे,के.सी.पवार,राहुल उभे,एड.अमित दरेकर,सुहास साबळे,योगिता सावळे,अख्तर खान,कुसुम दहिरे तसेच शेकडो पथ विक्रेते सहभागी झाले

.या सर्वानी घोषणा देवून पालिका परिसर दणाणून सोडला.संजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांची भेट घेवून निवेदन दिले

आणि ठोस कृती कार्यक्रमाची मागणी केली.आयुक्तांनी बायोमेट्रिक सर्वेक्षणासह मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.या निवेदनाच्या प्रती राज्यपाल,मुख्यमंत्री यानाही पाठविण्यात आल्या.ज्येष्ठ कार्यकर्ते अंकल सोनवणे,रुग्ण हक्क समितीचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

पथ विक्रेत्यांचे तात्काळ सर्वेक्षण करून त्यांना परवाने वितरित करावेत, पुणे महानगरपालिकेत शहर विक्रेता समितीसाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करावे, पथ विक्रेत्यांवर होणारी अतिक्रमण कारवाई थांबवावी, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना त्वरित अंमलात आणाव्यात, अतिक्रमण कारवाई करताना किमान तीन वेळा लेखी नोटीस द्यावी

, महानगरपालिकेच्या नव्या हद्दीत पथ विक्रेत्यांसाठी जागा निश्चित करावी, पथ विक्रेत्यांच्या दंडाच्या रकमेचा फेरविचार करून दंड कमी करावा,अतिक्रमण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनिमियन अधिनियम 2014 मधील तरतुदीचे प्रशिक्षण देवूनच त्यांच्या नियुक्त्या कराव्या अशा प्रलंबित मागण्या या आंदोलनाद्वारे पुन्हा मांडण्यात आल्या.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त हे पालिकेच्या पथ विक्रेता समितीचे अध्यक्ष असूनही ते पथ विक्रेत्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्या या दुर्लक्षाला वाचा फोडण्यासाठी हल्ला बोल आंदोलन आयोजित केले,या आंदोलनातून पथ विक्रेत्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्या तातडीने मान्य व्हाव्यात, अन्यथा प्रखर आंदोलन करू,असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला .

Latest News