स्वारगेट आणि मेट्रो स्टेशन, याबाबतचा प्रस्ताव, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला द्यावा, – परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ


पुणेः (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)-
चौकातून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी प्रवाशांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. आता स्वारगेट येथे मल्टीमॅाडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार स्वारगेट बस स्थानक आणि मेट्रो स्टेशन एकमेकांना जोडण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पुणे मेट्रोने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला द्यावा, अशा सूचना परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या
पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांच्या सध्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात आढावा बैठक पार पडली. पुणे मेट्रोच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत सद्यस्थितीत सुरू असणारी कामे तसेच पुर्णत्वास आलेली कामे तसेच प्रलंबित मार्गांचा आढावा यावेळी राज्यमंत्री मिसाळ यांनी घेतला.
शहरातील खडकवासला-खराडी मेट्रो मार्ग आणि एस.एन.डी.टी ते माणिकबाग मेट्रो जोडमार्ग हे दोन्ही प्रकल्प सध्या केंद्र सरकारडे प्रस्तावित आहेत. तर वनाज ते चांदणी चौक मेट्रो मार्ग तसेच रामवाडी ते विठ्ठलवाडी हे दोन मार्ग अंतिम मंजुरीसाठी राज्य कॅबिनेटकडे प्रस्तावित केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली
.यानंतर लगेचच कात्रज ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यात येणार असून, यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
याच मार्गावर धनकवडी आणि बालाजीनगर मेट्रो स्थानक होण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. शिवाय शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथे देखील शिवाजीनगर एसटी स्थानक मेट्रोसोबत समन्वय ठेवून एकत्रितरीत्या नियोजन करून निर्माण केले जाईल, असे मिसाळ यांनी सांगितले
पुढील आठवड्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एकत्रित बैठक होणार आहे. त्यामध्ये या गोष्टींवर निर्णय घेतला जाईल. राज्यात एसटी बसची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना वाहतुकीस मदत व्हावी, यासाठी परिवहन विभागांतर्गत पुणे शहरातील रिक्षा स्टँड, बस स्टँड किती आहेत, याचा आढावा घेऊन रोडमॅप करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सध्या पुण्यातील वाहतूक कोंडी एक मोठी समस्या बनलेली आहे. शहातील अनेक भागात वाहतूक कोंडी होत आहे. प्रशासनाकडून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक उपायोजना देखील करण्यात येत आहेत.
स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत.