कात्रज भागातील रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक…

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

कात्रज भागातील पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाला मारहाण करुन साडेतीन लाखांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन अल्पवयीनांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाने तक्रार दिली होती.

अल्पवयीनांनी केलेल्या मारहाणीत व्यवस्थापक जखमी झाला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगावकर, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चैाधरी, सागर बोरगे यांनी ही कारवाई केली

. . तक्रारदार तरुण पेट्रोल पंपावर व्यवस्थापक आहे. १३ जानेवारी रोजी दुपारी पेट्रोल पंपावर जमा झालेली तीन लाख ४६ हजारांची रोकड घेऊन तो बँकेत भरणा करण्यासाठी निघाला होता. त्यावेळी कात्रज-कोंढवा रस्त्यावर त्याला अडवून अल्पवयीनांनी दांडक्याने मारहाण केली. त्याच्याकडील रोकड असलेली पिशवी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला.

त्याने अल्पवयीनांना विरोध केला. त्यानंतर अल्पवयीन पसार झाले. जखमी अवस्थेतील व्यवस्थापकाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलीस कर्मचारी महेश बारावकर, चेतन गोरे यांनी कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले.