”बांगलादेशी” असल्याचा संशय आल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी- चंद्रकांत पाटील


(पुणे :ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) –
बांगलादेशींचे संकट आपल्या दारापर्यंत पोहोचले असून, नागरिकांनी सतर्क रहावे. संशयितांची माहिती त्वरीत पोलिसांना द्यावी’, असे आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले.पुणे पोलिसांच्या पश्चिम प्रादेशिक विभागाकडून विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला तीन कोटी ८४ लाख रुपयांचा ऐवज ३०० तक्रारदारांना परत करण्यात आला. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी मुंबई-पुणे शहरातील बांगलादेेशी घुसखोर, त्यांच्या समस्येबाबत सूचक भाष्य केले
बांगलादेशी घुसखोरांचा पुणे-मुंबईत वावर आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणात बांगलाादेशी नागिरकाला पकडण्यात आले होते. अगदी आपल्या घरासमोर, तसेच रस्त्यावरील फेरीवालाही बांगलादेशी असू शकतो, याची अनेकांना जाणीव नसते. अशा वेळी नागरिकांनी जबाबदारी झटकून चालणार नाही.
एखादा फेरीवाला, मजूर बांगलादेशी असल्याचा संशय आल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पुण्यातील लोकसंखा, विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्याअनुषंगाने शहरातील समस्या वाढत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे पोलीस दलातील पायाभूत सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासनासकडून प्रयत्न करण्यात येत आहे
पोलीस दलाला येत्या काही महिन्यात एक हजार पोलीस शिपाई उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.’ चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला, तसेच आपल्या आजुबाजूला वावरणारे फेरीवाले बांगलादेशी असू शकतात
. या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, संभाजी कदम, स्मार्तना पाटील यावेळी उपस्थित होते