पुण्यातील कोरेगांव पार्कातील हुक्का पार्लर अन् बेकायदा दारू विक्रीवर पोलिसांची छापेमारी…


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
कोरेगांव पार्कातील हुक्का पार्लर अन् बेकायदा दारू विक्रीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. लेन नं. ७ मधील पॉवर प्लाजा बिल्डिंगमधील हॉटेल पाल्मोकोवर ही कारवाई केली आहे.
याप्रकरणी शिवा वासुदेव सरकार (वय ३२, रा. वडगाव शेरी), शाहीद निशार अहमद हुसेन (वय २१, रा. कोरेगाव पार्क) आणि नबिल मकसुद पिरजादे (वय ३०, रा. वारजे माळवाडी), इम्रान मोहम्मद गौस रेहाली (वय ३३, रा. वडगाव शेरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस हवालदार प्रविण सुधीर पडवह यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई हॉटेल पाल्मोका येथे रविवारी सायंकाळी पावणे आठ वाजता करण्यात आली
.कोरेगांव पार्कातील नागरिकांशी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी ऐकूण कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी कोरेगाव पार्क येथील लेन नं ५, ६, ७ मध्ये पायी पेट्रोलिंग करत नागरिकांशी संवाद साधला.
अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांना या अडचणी सोडविण्यासोबतच कारवाईचे देखील आश्वासन दिले. तेव्हा कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पथक लेन नंबर ७ मध्ये पेट्रोलिंग करताना हॉटेल पाल्मोको मध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमधील टेबलवर हुक्का पॉट, तंबाखुजन्य अल फकेर व रॉयल स्मोकीन नावाचे हुक्का फ्लेवर असा २२ हजार ९६ रुपयांचा माल ग्राहकांना धुम्रपानासाठी अवैधरित्या विक्रीकरता ठेवलेला दिसून आला
. त्याचप्रमाणे दारु विक्रीची कोणताही परवाना नसताना हॉटेलचे किचन रुममध्ये १३ हजार ५७५ रुपयांच्या दारुच्या बाटल्या आढळून आल्या. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे अधिक तपास करीत आहेत.