सांस्कृतिक व शांतताप्रिय शहरातील कायदा व सुव्यवस्था ऱाखण्यात पुणे पोलिसांनी यश:पोलीस आयुक्त


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
सांस्कृतिक व शांतताप्रिय शहरातील कायदा व सुव्यवस्था ऱाखण्यात पुणे पोलिसांनी यश आल्याचे दिसत असून,परिणामी शहरातील ‘स्ट्रीट क्राईम’मध्ये मोठी घट झाली आहे. खून, खूनाचे प्रयत्न, घरफोडीत मोठी घट झाली आहे,अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
पोलिसांकडून सुरू असलेल्या कडक उपाययोजना व तात्काळ दखल घेण्यामुळे अशा गुन्ह्यांत घट झाल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे फसवणूकीचे गुन्हे वाढल्याचे दिसत असले तरी भू-माफिया तसेच आर्थिक फसवणूकीच्या तक्रारींची दखल घेऊन गुन्हे नोंदविल्याने हे गुन्हे वाढल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहरातील वार्षिक गुन्हे आढावा (२०२३-२४) पत्रकार परिषदेचे आयोजन पोलीस आयुक्तालयात करण्यात आले होते. त्यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरीक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, मनोज पाटील तसेच गुन्हे शाखेचे शैलेश बलकवडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाहन चोरीचे गुन्हे वाढण्यापासून रोखण्यात यश आले आहे. गेल्या काही वर्षात वाढलेल्या या गुन्ह्यांना बऱ्याच काळानंतर आवर बसल्याचे म्हणता येईल. गेल्या वर्षी (२०२४) शहरात एकूण १२ हजार ९५४ गुन्हे नोंदवले गेले आहेत
. तर, २०२३ मध्ये ११ हजार ९७४ गुन्हे नोंदविले गेले होते. वाढलेल्या एक हजार गुन्ह्यांमध्ये मुख्यत्वे फसवणुकीच्या सुमारे १ हजार प्रकरणांत गुन्हे नोंदवले गेले असल्याने ही वाढ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. ज्यामध्ये आर्थिक गुन्हे आणि भूमाफियांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर गुन्हे नोंद केले गेले आहेत.
पुणे पोलिसांनी एमपीडीएची ऐतिहासिक कारवाई केली असून, एका वर्षात तब्बल १०३ गुन्हेगारांना कारागृहात वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. तर, मोक्कानुसार ४८ गँगवर कारवाईकरून जवळपास ३४० गुन्हेगारांना कारागृहात पाठविले आहे. ही कारवाई आतापर्यंतची मोठी कारवाई आहे.
तसेच, पावणे तीनशे गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात आले आहे.
पुणे पोलिसांनी ऐतिहासिक कारवाई करून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यासोबतच शहरातील ड्रग्ज पुरवठादार यांच्यावरही प्रथमच कारवाई करण्यात आली. पोलिसांनी वर्षात १२९ कारवाईकरून २०४ तस्करांना बेड्या ठोकल्या. तर एकूण ३७ कोटींचे ड्रग्ज देखील पकडले. अशी कारवाई देशात प्रथमच झाली आहे.
कमी झालेले गुन्हे
खून- ९३ (९ टक्यांनी घट)
खूनाचा प्रयत्न- १८६ (२४ टक्यांनी घट)
घरफोडी- ५२७ (१३ टक्यांनी घट)
वाहन चोरी- १९८९ (०.२ टक्यांनी घट)
महिला सुरक्षेला प्राधान्य
शहरात गेल्या वर्षी महिला अत्याचारप्रकरणात आकडेवारीनुसार वाढ झाली. मात्र, ही वाढ पोलिसांनी शाळा, महाविद्यालयात सुरू केलेले बॅड टच, गुड टच सारखे उपक्रम, बैठका, चिमुकल्यांच्या कार्यशाळा तसेच महिलांच्या प्रत्येक तक्रारीवर कारवाई यामुळे वाढ झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. यानूसार बलात्काराच्या गुन्ह्यात यंदा १०० तक्रारी वाढल्या आहेत. तर विनयभंगाच्या गुन्ह्यात ८९ ने वाढ झाली आहे.
— विशेष बाल पथकांकडून बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी मुलांचे त्यांच्या पालकांचे समुपदेशन
— ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून ज्येष्ठांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य
— पासपोर्ट व्हेरिफिकेशन मिळण्याचा कालवधी कमी करून तो ७ दिवसावर आणला, दीड लाख पासपोर्ट दिले
— चारित्र्य पडताळणीत देखील पोलिसांनी आघाडी घेत सव्वा लाख नागरिकांचे व्हेरिफिकेशन केले आहे.
— गेल्या वर्षात केवळ २३ जणांना नवीन पिस्तूल परवाना, तब्बल १११ जणांचे परवाने रद्द
— वेगवेगळ्या प्रकरणात पोलीस कर्मचारी व अधिकार अशा ५२ जणांना निलंबित केले तर १४ जणांना बडतर्फ केले.