पिंपरी चिंचवड विद्यापीठात जीवनदायिनी रक्तदान शिबिर संपन्न…

पिंपरी, पुणे (दि. २४ जानेवारी २०२५)(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगांव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ मधील येथे जीवनदायिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मनीमाला पुरी यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी विद्यापीठाच्या फार्मा व्हिजनरी क्लब आणि स्कूल ऑफ मॅनेजमेंट व रेड प्लस ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. विद्यार्थी आकाश कुंभार आणि श्रेया वरुटे यांच्यासह १९२ दात्यांनी रक्तदान केले. आयोजनात स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे प्रमुख डॉ. अमित पाटील आणि सह. प्रा. प्रुथा सांबरे यांनी केले. सहभागी रक्तदात्यांना रेड प्लस ब्लड बँकेच्या वतीने कार्ड देण्यात आले. पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे आणि पीसीईटी अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन केले.

Latest News