मोतीबाग येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुण्या उद्योजक संगीता ललवाणी यांचे हस्ते ध्वजारोहणउद्योजक अजय प्रभू यांची मुख्य उपस्थिती


पुणे (प्रतिनिधी) (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतांचे कार्यालय “मोतीबाग” येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रसिद्ध उद्योजक व एडीसॉफ्ट टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक अजय प्रभू यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून गोल्ड मार्ट ज्वेलर्सच्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या संगीता ललवाणी या उपस्थित होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग संघचालक ॲड प्रशांत यादव,कार्यवाह राहुल पुंडे,भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी,कार्यवाह प्रसाद खेडकर यांची या प्रसंगी मुख्य उपस्थिती होती.राजीव जोशी यांचे हस्ते प्रमुख पाहुण्यांचा भारत मातेची प्रतिमा व राष्ट्रीय विचारांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.ॲड प्रशांत यादव यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित नागरिकांना व स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी शहरातील नागरिक स्वयंसेवक,मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व सर्व उपस्थितांच्या हस्ते भारत मातेचे पूजन या वेळी करण्यात आले.तसेच संविधानचेही पूजन करण्यात आले.
ई -कचरा संकलन अभियानाचा
प्रारंभ- या वेळी ई-कचरा जनजागृती व संकलन अभियानचे प्रातिनिधिक स्वरूपात गोल्ड मार्ट ज्वेलर्स च्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या,प्रसिद्ध उद्योजिका संगीता ललवाणी यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी उपस्थितांनी आणलेला ई-कचरा सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेमध्ये जमा करण्यात आला.