मराठा वधू – वर परिचय मेळाव्याचे तळेगाव येथे आयोजन

पिंपरी : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
मराठा समाजातील अविवाहित तरुण-तरुणींसाठी जोडी जमवा वधू-वर सूचक केंद्राच्यावतीने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. ०२ फेब्रुवारी) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हा मेळावा तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयात होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते होईल, अशी माहिती जोडी जमवा वधू – वर सूचक मंडळाचे अध्यक्ष तुषार क्षीरसागर यांनी दिली.
मंडळातर्फे वधू-वर परिचय मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो. मराठा समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती, तसेच त्यांच्या पालकांना अनुरूप स्थळ शोधून विवाह जुळवण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने मिळते. या मेळाव्यामध्ये युवक – युवतींना आयुष्याचा जोडीदार कसा असावा, त्याच्या अपेक्षा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील इच्छुक वधू – वरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Latest News