पीसीसीओईआर (PCCOER) मध्ये सोमवारी रोबोराष्ट्र या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन…


पिंपरी, पुणे – (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) दि. ३० जानेवारी २०२५ –
देशभरातील सर्वोत्तम तरुण प्रतिभावंतांना नावीन्यता आणि त्यांच्या कौशल्याचे स्पर्धात्मक सादरीकरण करण्यासाठी रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च मधील रोबोहॉक क्लबद्वारे “राष्ट्रीय रोबोराष्ट्र २के२५” टेक फेस्ट चे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च येथे सोमवारी (दि.३ फेब्रुवारी) ही स्पर्धा केले आहे. या स्पर्धेत यंत्रोउत्सव, रेस्क्यू ऑलिंपिक्स या दोन विभागात होईल. यात नाविन्यपूर्ण आणि अद्वितीय रोबोटिक प्रोजेक्ट्स सादर करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तंत्रज्ञान आणि इंजिनीअरिंगचा उपयोग करून समस्यांचे निराकरण कसे करता येईल हे दाखवले जाईल.

रेस्क्यू चॅलेंजवर आधारित ही स्पर्धा आहे, ज्यामध्ये स्पर्धकांना त्यांच्या समस्येचे निराकरण करण्याचे आणि तांत्रिक कौशल्यांचे प्रदर्शन करायचे आहे. संघांचे सहकार्य, रणनीती, आणि नवकल्पनांची चाचणी घेतली जाईल. या स्पर्धेसाठी देशभरातून ९० पेक्षा जास्त संघ आणि आणि ३०० स्पर्धकांनी नोंदणी केली आहे.पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, मित्सुबिशी इलेक्ट्रिकचे जनरल मॅनेजर सुनील मेहता आणि सहाय्यक जनरल मॅनेजर राजेंद्र महाजन, पीसीईटीचे उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य प्रा. डॉ. हरिष तिवारी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना दोन लाख वीस हजार रुपयांचे विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत.या स्पर्धेच्या आयोजनात विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य परदेशी, ओम खरे, खुशी रोहरा, चंद्रकांत राऊत, समन्वयक प्रा. महेंद्र साळुंके, संगणक विभाग प्रमुख प्रा. डॉ. अर्चना चौगुले आदींनी सहभाग घेतला आहे.रोबोराष्ट्र २के२५ ही फक्त स्पर्धाच नाही, तर नावीन्यता आणि प्रतिभेचा उत्सव आहेविद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी आणि त्यांच्या सर्जनशीलतेचे सादरीकरण करण्यासाठी हे व्यासपीठ आहे. इच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समन्वयक प्रा. महेंद्र साळुंके यांनी केले आहे.