”डॉ आंबेडकर” यांच्या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठीची राखीव जागा खासगी बिल्डरला देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ” आंदोलन

7 फेब्रुवारी रोजी समाजाच्या आणि समितीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचे लाक्षणिक धरणाप्रदर्शन

पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

शिव-फुले-शाहू-आंबेडकरी जनतेच्या भावनांचा अनादर करून विस्तारीकरनाच्या न्याय मागणीला धुडकावून लावून विद्यमान मुजोर सरकार व संबंधित अधिकाऱ्यांनी ही स्मारकाच्या विस्तारीकरणाची जागा खासगी बिल्डरला देऊन त्याठिकाणी काम सुरू करून महापुरुषांच्या विषयी आपली तिरस्काराची भावना प्रकट केलेली आहे.याला थांबून पायबंद घालणे आवश्यक झाले आहे.

सर्व शिव – फुले- शाहू- आंबेडकरी चळवळीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी बांधवांनो,
विश्वरत्न, प्रज्ञासूर्य बोधिसत्व, महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब डॉ.भिमराव आंबेडकर यांच्या पुणे येथील स्मारकाच्या विस्तारीकरणासाठीची राखीव जागा खासगी बिल्डरला देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात उभे रहा!

विश्वरत्न, प्रज्ञासूर्य,बोधिसत्व भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकर यांचे पुणे शहरातील स्मारक म्हणजे फक्त एक वास्तू नाही, तर तो बहुजनांच्या हक्कांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचे प्रतीक आहे.
डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा व विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विद्यमान स्मारकाची जागा केवळ 10 गुंठे असून ती तोकडी आहे त्यासाठी या स्मारकाचे विस्तारीकरण आवश्यक आहे.


त्यासाठी स्मारकाच्या शेजारील MSRDC ची 89 गुंठे जागा विस्तारीकरणासाठी सरकारकडून देण्यात यावी यासाठी समस्त आंबेडकरी संघटना आणि चळवळीचे नेते, प्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने पुणे महानगर पालिकेने ठराव करून मागणी केलेली आहे.

मात्र, विद्यमान सरकार आणि अधिकाऱ्यांनी ही स्मारकाच्या शेजारील जागा विस्तारीकरणाला देण्यास विरोध करून खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा कट रचला आहे!
या स्मारकाच्या विस्तारित योजनेचा उपयोग समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक, सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय विकासाच्या कार्यासाठीच होणार आहे. ही बाब विद्यमान विद्वेषी सरकार आणि संबंधित अधिकारी यांना होऊ द्यायची नाही.

हा निर्णय अन्यायकारक आणि बहुजन समाजविरोधी आहे!

ही जागा स्मारकाच्या विस्तारासाठी राखून ठेवली गेली पाहिजे, व्यावसायिक विकासाच्या नावाखाली अधिकारी आणि खासगी बिल्डर यांच्या आर्थिक फायद्यासाठी नाही.

ही जागा खाजगी बिल्डरकडे हस्तांतरणामुळे स्मारकाच्या भविष्यातील विकासावर मर्यादा येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला पुढे नेण्यास मर्यादा येतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार थांबवण्याचा हा अप्रत्यक्ष कट आहे.

या निर्णयामुळे बहुजन समाजाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशावर गदा येणार आहे.

सरकारच्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याकडे पाहण्याचा हा संकुचित दृष्टिकोन त्यांचे भारतीय संविधानाप्रती आणि बहुजन समाजाच्या उत्थानासाठी केलेले कार्य , दिलेले योगदान दुर्लक्षित करून एक प्रकारे बहुजनांच्या महापुरुषांचा अवमान करण्याचा विद्यमान सरकार आणि संबंधित अधिकारी यांचा हा डाव आहे.

शिव-फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीच्या आणि विचाराच्या वारसांनी,अनुयायांनी, समस्त जनतेने
विद्यमान सरकारच्या आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच्या या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात आणि
महापुरुषांच्या सन्मानार्थ मैदानात उतरायला हवे.या लढ्यात तन मन धनाने सहभागी व्हायला हवे.
या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात
आता काय करायचे?
✅ सरकारच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात ठिकठिकाणी निदर्शने, मोर्चे आणि आंदोलन करायाची आहेत. ✅ सोशल मीडिया आणि पत्रकाच्या माध्यमातून हा अन्याय समस्त जनतेसमोर आणा. ✅ या लढयात विजय मिळेपर्यंत सर्व शिव-फुले शाहू- आंबेडकरी विचारांच्या सामाजिक आणि संविधानप्रिय संघटनांनी एकत्र येऊन लढा उभारावा. ✅ विधिमंडळ, न्यायालय आणि लोकशाही मार्गांचा वापर करून हा निर्णय रोखा.


यासाठी येत्या 7 फेब्रुवारी रोजी समाजाच्या आणि समितीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचे लाक्षणिक धरणाप्रदर्शन करण्यात येणार आहे,
सर्व शिव-फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीच्या आणि विचाराच्या वारसांनी,अनुयायांनी, समस्त जनतेने या धरणा प्रदर्शन कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून लढयास तनमन धनाने सहभागी।व्हावे.
जय भीम! जय संविधान! जय भारत!
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक विस्तारीकरण लढा संघर्ष समिती

Latest News