देशाचा २०२५-२६ वित्तीय वर्षासाठी अर्थसंकल्प जाहीर…


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
दिल्ली : | देशाचा अर्थसंकल्प मांडताना आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वच क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. गंभीर आजारावरील 36 अत्यावश्यक औषधांवरील ड्यूटी टॅक्स हटविण्यात आल्याने ही औषधे स्वस्त झाली आहेत.
उद्योजक महिलांसाठी कर्जसुविधा, शाळांसाठी सुविधा, अशा विविध घोषणा आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना केल्या.
निर्मला सीतारमण यांनी केलेल्या महत्वाच्या घोषणासर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर डे केयर सेंटर उभारले जातील. कॅन्सरच्या उपचारासाठी औषधे स्वस्त होणार. 6 अत्यावश्यक औषधांवरील कस्टम ड्यूटी 5 टक्के करण्यात आली आहे.
डिजिटल शिक्षणासाठी सर्व सरकारी माध्यमिक विद्यालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल.सरकार 10,000 कोटी रुपयांची तरतूदीद्वारे स्टार्टअप्ससाठी निधीची व्यवस्था करणार आहे. सरकार प्रथम पाच लाख महिलांना, एससी आणि एसटी उद्योजक महिलांसाठी 2 कोटी रुपयांचे कर्ज देईल.भारतीय पोस्ट ऑफिस हे एका मोठ्या सार्वजनिक लॉजिस्टिक्स संस्थेत परवर्तीत केले जाईल
शिक्षण क्षेत्रासाठी अटल टिकरिंग लॅब, डिजिटल ब्रॉडबँड, कौशल्य वाढीचे सेंटर, भारतीय भाषा पुस्तक स्कीम, तसेच वैद्यकीय आणि IIT क्षेत्रात मोठ्या सुधारणा करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले.
ल्पनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. अर्थ संकल्पनेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे कि येत्या ५ वर्षांमध्ये देशात जवळजवळ ५० हजार अटल टिकरिंग लॅब उभारण्यात येणार आहे. याचा तरुणांना मोठा लाभ घेता येणार आहे.
तसेच या डिजिटलायजेशनच्या युगात, बजेटमध्ये एक महत्वाची बाब मांडण्यात आली आहे. लवकरच देशातील सर्व सरकारी शाळांमध्ये डिजिटल ब्रॉडबँड बसवण्यात येणार आहे. देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांमधील डिजिटल अंतर कमी करण्याचा निर्धार या बजेटच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तसेच शाळांमध्ये आरोग्य विभाग उभारण्यावर लक्ष दिले जाईल.