भव्य “संविधान भवन” उभारण्याचे दिले जिल्हाधिकारी,यांचे आश्वासन…


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) –
PWD ने ही जागा MSRDC ला लीजवर दिली होती तर ती जागा पुन्हा एखाद्या खाजगी बिल्डरला लीजवर कशी देता येऊ शकते ? असा प्रश्न करून जिल्हाधिकारी यांनी आश्चर्य व्यक्त केले. मा. जिल्हाधिकारी यांनी अत्यंत गांभीर्याने शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले व शेवटी शिष्टमंडळाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या जागेवर भव्य संविधान भवन उभारण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच त्याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवना शेजारील 8900 चौ. मी. जागा भवनाचे विस्तारीकरणासाठी मिळावी, याकरिता याकरिता शिव-फुले- शाहू व आंबेडकरी जनतेच्या वतीने भव्य मोर्चा व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मागण्यांचे निवेदन घेऊन गेलेल्या शिष्टमंडळास जिल्हाधिकारी मा.जितेंद्र डूडी यांनी आश्वासन दिले.
शिष्टमंडळात माजी आमदार ॲड.एल टी सावंत, ॲड.जयदेव गायकवाड, माजी उपमहापौर सुनीताताई वाडेकर, ॲड अविनाश साळवे, परशुराम वाडेकर, डॉ सिद्धार्थ धेंडे, शैलेंद्र चव्हाण, ॲड किरण कदम, बाळासाहेब जानराव, ॲड अरविंद तायडे, सुदीप गायकवाड,संजय सोनवणे, राहुल डंबाळे,गौतम ललकारे, बापूसाहेब भोसले, युवराज बनसोडे, संगीताताई आठवले, सुवर्णाताई डंबाळे इ. मान्यवरांचा समावेश होता.
तत्पूर्वी वरील मागणी करिता डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीने मालधक्का चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला व तेथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुणे शहर,पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने अबालवृद्ध सहभागी झाले होते.
याप्रसंगी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे होते. आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होई पर्यंत एकत्रित लढा देण्याचे सर्वच वक्त्यांनी जाहीर केले.
आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी शैलेंद्र चव्हाण, नागेश भोसले, महिपाल वाघमारे, राहुल डंबाळे, विवेक बनसोडे, सचिन बनसोडे, सर्जेराव वाघमारे, शैलेंद्र मोरे, सागर आल्हाट, यशवंत नडगम, श्याम गायकवाड,सुजीत यादव,नवनीत अहिरे,संदीप चौधरी यांच्या सह अनेकांनी प्रयत्न केले.
आंदोलनाला तन मन धनाने मदत करून आंदोलन यशस्वी करणारे ज्ञात-अज्ञात कार्यकर्ते, आंदोलनात सहभागी झालेला जनसमुदाय व पुणे पोलीसांचे जाहीर आभार.