अभिजीत आपटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग विभाग प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती – श्री चैतन्य जोशी


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा श्री सुभाष दादा मालपाणी यांच्या उपस्थितीत आज अभिजीत आपटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार) उद्योग विभाग प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग विभागातर्फे नियुक्तीपत्र देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुभाष जी मालपाणी साहेब व पश्चिम महाराष्ट्राचे आमचे सहकारी श्रीकांत जी कदम, श्री राजाराम विठ्ठलराव सातपुते पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष, श्री प्रवीण बाळासो जगताप पश्चिम महाराष्ट्र विभागीय सरचिटणीस यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
श्री चैतन्य जोशी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष उद्योग विभाग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग विभाग कार्यपद्धती आणि ग्रामीण उद्योग विकास यावर चर्चा केली. मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील आण्णा शेळके यांनी अभिजीत आपटे यांच्यातील नेतृत्वगुण हेरुन उद्योग विभागावर घेण्यासाठी शिफारस केली असली तरी अभिजीत आपटे यांचा औद्योगिक क्षेत्रातील अभ्यास, कृषी प्रक्रिया उद्योगातील सखोल ज्ञान, सरकारी अनुदान योजनांची माहिती यावरील प्रभुत्व मुलाखतीमधुन लक्षात घेऊन अभिजीत आपटे यांच्या नियुक्ती वर शिक्कामोर्तब केले.

Latest News