सरकार ”धसांना” बुजगावण्यासारखे उभे करून मुळ प्रश्नापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न… नाना पटोले

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या या अत्यंत गंभीर घटना आहेत. दोन्ही प्रकरणात सरकार चालढकल करत आहे. बीड प्रकरणात भाजपाचे आमदार सुरेश धस दररोज नवीन सनसनाटी आरोप करत आहेत. पण सरकार काहीच कारवाई करत नाही. यावरून हे सर्व ठरवून सुरु आहे असे दिसते. आता त्यांनी परभणी प्रकरणात पोलिसांना माफ करण्याची भाषा केली आहे. हा दुटप्पीपणा असून तो फक्त सुरेश धस यांचा नसून सरकारचा दुटप्पीपणा आहे. सरकार सुरेश धसांना बुजगावण्यासारखे उभे करून मुळ प्रश्नापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे, कृषी विभागातील भ्रष्टाचारावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारच्या काळात कृषी विभागाने भ्रष्टाचाराचे विक्रम केले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी परस्पर गायब केला. कापूस खरेदी पिशव्या असो वा नॅनो युरिया खरेदी असो, शेतकऱ्यांच्या योजना केवळ कागदावर राहिल्या. शेतकऱ्यांच्या योजनांसाठी डीबीटी पद्धतीचा वापर केला जात असताना त्याला बगल देऊन कृषी विभागाने घोटाळे केले. कृषी विभागातील भ्रष्टाचाराला फक्त कृषी विभागातील अधिकारी व कृषी मंत्रीच जबाबदार नाहीत तर तत्कालीन मुख्यमंत्री व राज्य सरकारही तितकेच जबाबदार आहे.

Latest News