सफाई कामगारांच्या वारसा हक्का बाबत मा. उच्च न्यायालयाच्या आदेश लागू केला जाईल :केंद्रीय मंत्री रामदास आठवले


केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे संजय जगदाळे यांची मागणी वजा विनंती
पिंपरी, प्रतिनिधी (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
सफाई कामगारांच्या वारसा हक्का बाबत मा. उच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे. त्याची अमंलबजावणी करायला लावून त्या बाबत राज्यभरातील सर्वच महानगरपालिका, नगरपालिकांकडून अहवाल मागवून घेतला जाईल असे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आश्वासन दिले.आहे
रुग्णालयातील वार्ड बॉय,सिस्टर, आया, मावशी हे सुध्दा सतत विवीध आजारातील रुग्णांची सेवा करत असतात तर दिव्यांग कर्मचारी वर्गाला सुध्दा निवृत्त झाल्या नंतर त्यांचे मुले संभाळत नाहीत अशा अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे या वरील सर्व घटकाला सुध्दा लाड-पागे समितीच्या वारस हक्काच्या शिफारसी लागू कराव्यात अशी मागणी करुन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबत निर्णय देऊनही पिंपरी चिंचवड महानगरापालिकेने अद्यपही त्या आदेशाची अमंलबाजवणी केली नाही या बाबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या कडे शिव-फुले-शाहु-आंबेडकर विचार कर्मचारी मंचाचे अध्यक्ष संजय जगदाळे यांनी तक्रार केली आहे
. यावेळी शाम रोकडे, परशुराम कदम, संजय घुले, महादेव साबळे, सनी भोसले यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते
.
तसेच वॉर्ड बॉय, आया, मावशी व दिव्यांग व्यक्ति बाबत प्रथमच लाड-पागे समितीच्या वारसा हक्काच्या शिफारशीचा मुद्दा पुढे आला आहे. वास्तविक पाहता या घटकाला सुध्दा तशा शिफारशी लागू झाल्या पाहिजे या मताचा मी देखील आहे. या बाबत सर्वच कायदेशीर घटकाचा विचार करुन यावर सुध्दा तोडगा काडला जाईल असे आश्वासन मंत्री रामदास आठवले दिले.