बहिणींना सुरक्षित ठेवणार नसाल, तर त्या सरकारचा काय उपयोग? – सुप्रिया सुळे

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पीडित महिलांबाबत काही मंत्री वेळोवेळी चुकीची वक्तव्य करून असंवेदनशीलपणा दाखवत आहेत, हे राज्यासाठी अशोभणीय आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी या घटनांकडे गांभिर्याने लक्ष देऊन मंत्र्यांना चाप लावावा, असे आवाहनही त्यांनी केले. स्वारगेट बस स्थानकात झालेल्या अत्याचाराप्रकरणी सुळे यांनी सोमवारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधला.सुळे म्हणाल्या, ‘स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवर अत्याचाराची गलिच्छ घटना घडल्यानंतर हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळणे गरजेचे होते. परंतु, तसे झाले नसून सरकारमधील अनेक मंत्री तरुणीवर असंवेदनशीलपणे बोलत आहेत. संबंधित तरुणीच्या सहमतीनेच सर्व काही झाले आहे, असे वक्तव्य करून तिच्या चारित्र्याचीच बदनामी करत आहेत. एकीकडे महिलांबाबत महायुती सरकार लाडकी बहीणसारख्या योजनेबद्दल मोठमोठे दावे करत आहे, तर दुसरीकडे राज्यात महिलांवर अत्याचार होत असल्याचे केंद्र आणि राज्य सरकारच्याच आकडेवारीतून समोर येत आहे. सरकारने या घटनांकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे राज्यातील सत्ताधारी सरकार महिलांसाठी योजना राबवून लाडकी बहिणीच्या नावाने गोडवे गात आहेत, त्याच सरकारच्या काळात महिलांबाबत अत्याचार वाढत आहेत. बहिणींना सुरक्षित ठेवणार नसाल, तर त्या सरकारचा काय उपयोग? अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली. राज्यातील महिलांवर वाढत चाललेले अत्याचार तसेच बीड, परभणीसारख्या घटनांबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यालयीन भेट घेण्यासाठी मागील दोन आठवड्यांपासून प्रयत्न करत आहे. त्यांची अद्याप भेट झालेली नाही, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

Latest News