गुंड गजानन मारणेला न्यायालयीन कोठडी….


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
कोथरूड येथील भेलकेनगर येथे मारणे टोळीतील काही सराईतांनी देवेंद्र जोग या तरुणाला (दि.१९ फेब्रुवारी) मारहाण केली होती. याप्रकरणी प्रथम मारहाणीचा गुन्हा नोंद केला. नंतर मात्र गंभीर दखल घेत यात खुनाच्या प्रयत्नाचे कलम वाढ केले नंतर विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी आरोपी गजानन मारणेला ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज न्यायालयाने आरोपी मारणे याला न्यायालयील कोठडी सुनावली आहे
पोलिसांनी गजानन मारणे याच्यासह रुपेश मारणे, ओम तिर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली
. तर रुपेश मारणे आणि बाब्या पवार हे आरोपी फरार आहेत.याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर गजानन मारणे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला. गजानन मारणे याने साथीदारांना तक्रारदार तरुणाला भर चौकात जिवे मारण्यासाठी चिथावणी दिली, असा दावा पोलिसांनी केला होता.
दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिघा आरोपींना पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरंटद्वारे ताब्यात घेतले.
मारणेच्या कोठडीची मुदतही संपली. त्यामुळे या चौघांनाही पोलिसांनी विशेष न्यायालयात हजर केले होते.गुंड गजा मारणे टोळीच्या सराइतांकडून आयटी कर्मचारी मारहाण प्रकरणात “आपल्याला मारहाण करणाऱ्या आरोपींना कोणीही चिथावणी दिली नसल्याचे” प्रतिज्ञापत्रच तक्रारदार आयटी कर्मचाऱ्याने सोमवारी विशेष न्यायालयात सादर केले.
‘मस्ती आली आहे, साल्याला मारा,’ अशा शब्दांत तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींना गजानन मारणे याने चिथावणी दिल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला होता. मात्र, मारहाण करणाऱ्या आरोपींव्यतिरिक्त कोणीही घटनास्थळी हजर नव्हते, आरोपींनी कोणाच्याही सांगण्यावरून मला मारहाण केली नाही, असे तक्रारदार तरुणाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे
आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे, तसेच फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत दहा दिवसांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी तपास अधिकारी सहायक आयुक्त गणेश इंगळे व विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी केली.
बचाव पक्षातर्फे अड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. आरोपी गजानन मारणे घटनास्थळी हजर नव्हता, त्यामुळे त्याने चिथावणी देण्याचा प्रश्नच येत नाही. तक्रारदारानेही वकिलामार्फत हजर राहून त्याला पुष्टी दिली आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.
तो ग्राह्य धरत न्यायालयाने गजानन मारणेला न्यायालयीन कोठडी सुनावली, तर अन्य तीन आरोपींच्या कोठडीत ६ मार्चपर्यंत वाढ केली. ही घटना तत्कालिक कारणाने व गैरसमजुतीने झाली असून, मला मारहाण करणाऱ्या तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार दिली होती
. मारहाण करण्यापूर्वी, मारहाण होताना व झाल्यानंतर कोणत्याही लोकांनी कोणतीही चिथावणी दिलेली नाही. मारहाण करणाऱ्या आरोपींव्यतिरिक्त इतर कोणीही घटनास्थळी हजरही नव्हते. ही घटना क्षणिक रागातून झालेली असून, माझ्या समक्ष कोणाच्याही सांगण्यावरून आरोपींनी मला मारहाण केलेली नाही. हे प्रतिज्ञापत्र कोणत्याही दबावाला अथवा दहशतीला बळी न पडता न्यायालयात स्वखुशीने सादर करत आहे,’ असेही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.