कसब्यातील सुज्ञ जनता त्यासोबत झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही- वींद्र धंगेकर

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) माझ्या कसबा विधानसभेतील नागरिकांना नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणार, असे आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकीत त्यांनी मते घेतली. आता प्रत्यक्षात मात्र घरोघरी पाण्याचे मीटर बसवून त्यांच्याकडून अन्यायकारक पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. कसब्यातील सुज्ञ जनता त्यासोबत झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही, असे रवींद्र धंगेकर यांनी बॅनरवर लिहिले आहे. आता सत्ताधारी पक्षामध्ये असून देखील धंगेकर यांनी लावलेल्या फ्लेक्समुळे पुण्यात राजकारण चांगलेच तापले आहे.रवींद्र धंगेकर यांनी चौथ्यांदा पक्षांतर केले. त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “रवींद्र धंगेकर हे पुण्यातील लोकप्रिय लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांची ओळख कामाने निर्माण केली आहे. यांच्या पोटनिवडणुकीवेळी मी तिकडे होतो. ती निवडणूक गाजली पण, सगळी फौज लागली तरी धंगेकरांनी बाजी मारली आणि लोकसेवक काय असतो हे दाखवले कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी केली आहे. कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्समध्ये भाजपचे विद्यमान आमदार हेमंत रासने यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्याचे पहायला मिळत आहे. कसबा विधानसभेतील नागरिकांना पाण्याचे मीटर बसल्यावरुन त्यांनी लक्ष्य केले आहे. रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत आमदार हेमंत रासने यांना लक्ष्य केले आहे. यामुळे धंगेकर यांनी पक्षांतर केले असले तरी त्यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत वादंग तसेच आहेत. रासने विरुद्ध धंगेकर अशी राजकीय लढत आजही कसबामध्ये दिसून येत आहे.

Latest News