अतिक्रमण गोडावून सुरक्षा रक्षकांच्या बदल्या करण्याची मागणी ‘लोकजनशक्ती पार्टी रामविलास’ कडून आयुक्तांना पत्र….


पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पथ विक्रेत्यांवर होणाऱ्या कारवाईविषयी ‘लोकजनशक्ती पार्टी रामविलास’च्या प्रलंबित मागण्यांसदर्भात पुणे महापालिका आयुक्तांना आज स्मरणपत्र देण्यात आले आहे.या निवेदनात अतिक्रमण गोडावून सुरक्षा रक्षकांच्या बदल्या करण्याची मागणी करण्यात आली असून तेथील सीसीटीव्ही २४ तास सुरु ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.अतिक्रमण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनिमियन अधिनियम-२०१४ मधील तरतुदीचे प्रशिक्षण देवूनच त्यांच्या नियुक्त्या कराव्या ,अशा प्रलंबित मागण्या पुन्हा मांडण्यात आल्या.वारंवार पत्रव्यवहार,आंदोलन करून आयुक्त आणि पालिका अधिकारी भूमिका घेत नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
अतिक्रमण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनिमियन अधिनियम 2014 मधील तरतुदीचे प्रशिक्षण देवूनच त्यांच्या नियुक्त्या कराव्या,विक्रेत्यांवर कारवाई करताना त्यांच्या वस्तूंची यादी करावी,त्याची प्रत संबंधित विक्रेत्याला द्यावी,त्यावर कारवाईचे अधिकार असलेल्या अधिकाऱ्याचीच सही असावी,जप्त केलेल्या वस्तूंच्या दंडाची पावती जागेवर द्यावी अशा प्रलंबित मागण्या या आंदोलनाद्वारे पुन्हा मांडण्यात आल्या.आठ दिवसात या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.लोकजन शक्ती पार्टी रामविलास या पक्षाचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट , के.सी. पवार,कल्पनाताई जावळे,राहुल उभे,एड.अमित दरेकर,अख्तर शेख,पन्ना कोडितकर उपस्थित होते.