भारतीय जनता पार्टी एक सशक्त राष्ट्राच्या निर्माणासाठी समर्पित पक्ष – आमदार शंकर जगताप

भारतीय जनता पार्टी एक सशक्त राष्ट्राच्या निर्माणासाठी समर्पित पक्ष – आमदार शंकर जगताप

पिंपरी,: भारताला एक मजबूत, समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र म्हणून जागतिक स्तरावर स्थापित करण्यासाठी कटिबद्ध असणारा भारतीय जनता पार्टी (भाजपा) राजकीय पक्ष आहे

. स्थापनेपासूनच, भाजपाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि लोकहिताच्या विषयांवर आवाज उठवून भारतीय लोकशाहीत प्रभावी भूमिका बजावली आणि भारतीय राजकारणाला नवीन आयाम दिले, असे प्रतिपादन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी केले.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशने सदस्य नोंदणीचा दीड कोटींचा टप्पा नुकताच पार केला.

भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांचं हे यश असून याच पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या ४५ व्या स्थापना दिवसानिमित्त ‘मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलन’ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले.

यानिमीत्त चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रात भाजपा सरचिटणीस नामदेव ढाके यांच्या यांच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमांवेळी ते बोलत होते.

ऑनलाइन संमेलनात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.तत्पूर्वी, ध्वजारोहण व महाराष्ट्र गीताने ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी सर्व पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी श्रीराम नवमी आणि भाजपा स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी, सरचिटणीस नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळुराम बारणे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, प्रसाद कस्पटे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेविका सविताताई खुळे, अश्विनीताई चिंचवडे, रवींद्र देशपांडे, मनोज तोरडमल, उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, बिभीषण चौधरी, योगेश चिंचवडे, युवा नेते दीपक भोंडवे, संकेत चोंधे, आदेश नवले, सचिन शिवले, भगवान निकम, भूषण पाटील, कैलास रोटे, योगेश महाजन, रवींद्र ढाके, मनोज पाटील, हेमंत ढाके, शंकर पाटील आदी उपस्थित होते.यासह भाजपा पक्ष कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमाताई खापरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडे, माऊली थोरात, कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, जिल्हा सरचिटणीस संजय मंगोडेकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तुषार हिंगे, आशा काळे, देवदत्त लांडे, राजश्री जायभाय, गीता महेंद्रु, वैशाली खाडये, मनोज ब्राह्मणकर, वीणा सोनवलकर, दीपक भंडारी, महेंद्र बाविस्कर, मंगेश घाडगे, युवराज लांडे, प्रतिभा जवळकर, सनी बारणे, नंदू भोगले, पल्लवी पाठक, राकेश नायर, अमेय देशपांडे, सीमा चव्हाण, संतोष टोणगे, मंडल अध्यक्ष निलेश अष्टेकर, विनोद पाटील, सतीश नागरगोजे, राहुल खाडे, बापूसाहेब भोसले, राकेश नायर आदी पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार शंकर जगताप म्हणाले की, ६ एप्रिल, १९८० रोजी नवी दिल्लीतील कोटला मैदानावर कार्यकर्त्यांच्या अधिवेशनात भाजपाची स्थापना झाली, ज्याचे पहिले अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी होते. भारतीय जनता पक्ष तळागाळात पोहोचला, याचे सर्वात मोठे श्रेय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे असून कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली दाद आणि भविष्याच्या वाटचालीसाठी केलेले मार्गदर्शन निश्चितच मोलाचे आहे

. भारतीय जनता पार्टी एक मजबूत, सशक्त, समृद्ध, सक्षम आणि स्वावलंबी भारताच्या निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील आहे. आधुनिक दृष्टिकोन असलेला एक प्रगतीशील आणि प्रबुद्ध समाज, जो प्राचीन भारतीय सभ्यता आणि संस्कृती आणि तिच्या मूल्यांपासून प्रेरणा घेऊन एक महान ‘जागतिक शक्ती’ आणि ‘विश्वगुरू’ म्हणून जागतिक स्तरावर स्थापित होईल,

अशा राष्ट्राची कल्पना पक्ष करतो.अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली, भाजपाने अनेक नवीन विकास मॉडेल स्थापित केले. पोखरण अणुस्फोट, अग्नी क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण, कारगिल विजय यांसारख्या यशांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढली. राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती, सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नवीन उपक्रम आणि प्रयोग, कृषी, विज्ञान आणि उद्योग क्षेत्रात जलद विकास, तसेच महागाई वाढू न देणे यांसारख्या अनेक उपलब्ध्या या सरकारच्या खात्यात जमा आहेत

. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच भाजपाचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले, जे आज ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेसह गौरवशाली भारताची पुनर्बांधणी करत आहे

. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सुमारे ११ कोटी सदस्यांसह जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे.मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने अल्पावधीतच अभूतपूर्व यश मिळवले आहे

. त्यांनी जगात भारताची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित केली, राजकारणावरील लोकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित केला. अनेक नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून नव्या युगाची सुरुवात केली. अंत्योदय, सुशासन, विकास आणि समृद्धीच्या मार्गावर देश पुढे जात आहे. आर्थिक आणि सामाजिक सुधारणा सुरक्षित जीवन जगण्याचा मार्ग उपलब्ध करून देत आहेत

. मोदी सरकारने ‘मेक इन इंडिया’, ‘स्किल इंडिया’, अमृत मिशन, दीनदयाळ ग्राम ज्योती योजना, डिजिटल इंडिया यांसारख्या योजनांमधून भारताला आधुनिक आणि सक्षम बनवण्याच्या दिशेने मजबूत पावले उचलली आहेत.

जनधन योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या अनेक योजना देशात नव्या क्रांतीची सुरुवात करत आहेत. भाजपा सरकारने देशवासियांना जगातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा योजनेची भेट दिली आहे, असेही शंकर जगताप म्हणाले.

Latest News