पुण्यातील एकाच सोसायटीतील दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास….

chor

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पुणे शहरात घरफोड्या तसेच चोऱ्यांच्या घटना पुन्हा मोठ्या प्रमाणात घडू लागल्या असून, हडपसरमधील गोडाऊनमधून साडे आठ लाखांची रोकड तर कसबा व कोंढव्यात घरातून रोकड व दागिने लांबविण्यात आले आहेत. गोडाऊनमधील रोकड ही येथे काम करणाऱ्यापैंकी एकानेच चोरून नेली आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ढोरे राहुल निसर्ग सोसायटीत राहायला आहेत. मध्यरात्री चोरटे सोसायटीच्या आवारात शिरले. चोरट्यांनी ढोरे यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडले. कपाटातील चार लाख १४ हजारांचे दागिने चोरले, तसेच याच सोसायटीतील रहिवासी प्रसाद जोशी यांचाही फ्लॅट फोडून चोरट्यांनी कपाटातील ५० हजारांची रोकड आणि दागिने असा ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे अधिक तपास करत आहेत. पुणे शहरात पुन्हा गाडीतून रोकड चोरून नेणारे चोरटे ‘अ‍ॅक्टीव्ह’ झाल्याचे दिसत असून, पर्वती दर्शनमध्ये कारची काच फोडून ५ लाखांची रोकड चोरून नेली आहे. तर, मार्केटयार्ड परिसरात मोपेड दुचाकीच्या डिक्कीतून १ लाखांची रोकड लांबविली आहे. दोन्ही घटनात ६ लाखांची रोकड पळविण्यात आली आहे. त्यामुळेच पुन्हा हे चोरटे अ‍ॅक्टीव्ह झाल्याचे दिसत आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात २६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात एकाच सोसायटीतील दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओंकार ढोरे (वय २९, रा. राहुल निसर्ग सोसायटी, अतुलनगर, वारजे माळवाडी यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.