राज्यातील जनतेला पारदर्शक सेवा उपलब्ध करून देणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट:उपमुख्यमंत्री पवार


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
सर्व सरकारी इमारतींवर सौर पॅनेल बसवले जातील आणि वीज निर्मिती कशी करता येईल, याचा विचार सुरू आहे. आरोग्याच्या सर्व सुविधा एकाच छताखाली आणण्याचे काम सुरू आहे. राज्यातील जनतेला जलद आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे.असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे
राज्य सरकारची कोणतीही कार्यालये भाडेतत्त्वावर ठेवायची नाहीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनतेला उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी महायुती सरकार काम करत आहे. येत्या दोन-तीन वर्षात सर्व इमारतींचे काम पूर्ण झाले पाहिजे.
मला सरकारी कार्यालये चांगली करण्याची आवड आहे. नागरिकांना आवश्यक सुविधा मिळायला पाहिजेत. पार्किंगची समस्या मोठी आहे. त्यामुळे आता बांधल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था केली जाईल,” असे अजित पवार यांनी सांगितले.“
ससून रुग्णालयाला आवश्यक निधी दिला जात आहे. पुण्यात अनेक प्रशासकीय इमारतींचं काम सुरू आहे. पोलिस आयुक्तालयासाठी १९३ कोटी रुपये, एसपी कार्यालयासाठी ६२ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र या इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
याशिवाय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नव्या 20 दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी जम्मू-कश्मिरमधील पहलगाममधील हल्ल्याबाबत भाष्य केले. तसेच सरकार 24 तास कार्यरत असलेल्या वेळापत्रकाची माहिती दिली“
पहलगाममध्ये जी घटना घडली यामध्ये संपूर्ण भारत अक्षरशः बदला घेतला पाहिजे, त्यांची जागा दाखवली पाहिजे, निष्पक लोक जातात, भ्याड हल्ले होतात. पंतप्रधानांनी काही निर्णय घेतले आहेत, अशा गोष्टी होता कामा नये. ज्याच्या डोक्यातून हे सगळं आलं त्याला आपली भारतीय सेना सोडणार नाही याचा मला विश्वास आहे,”