0१ मे हाराष्ट्र दिनाचा इतिहास…


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
१ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस मराठी अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी सांस्कृतिक, शासकीय तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा, कॉलेजेस, सरकारी संस्था या ठिकाणी विशेष परेड, संस्कृतिक कार्यक्रम, झेंडावंदन आयोजित केले जाते. या दिवशी महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभरात पसरलेले सर्वच महाराष्ट्रीयन लोक मोठ्या उत्साहात, आनंदाने आणि अभिमानाने साजरा करतात.
1950 च्या दशकात भाषावार राज्यांच्या निर्मितीसाठी आंदोलनं जोर धरू लागली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केलं. गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली. मात्र मुंबईचा समावेश महाराष्ट्रात व्हावा की नाही, यावरून मोठा वाद निर्माण झाला.
महाराष्ट्र दिनाचा इतिहास
21 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबईच्या फ्लोरा फाउंटन परिसरात हजारो आंदोलकांनी एकत्र येत सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार निदर्शने केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर पोलिसांनी लाठीचार्ज आणि नंतर गोळीबार केला.
या घटनेत 106 आंदोलकांना आपले प्राण गमवावे लागले. हे हुतात्मे आजही महाराष्ट्राच्या मनामनात जिवंत आहेत. त्यांच्या बलिदानामुळेच शेवटी केंद्र सरकारने नमते घेतलं आणि 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं.
महाराष्ट्र दिनासोबतच 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. कामगारांच्या हक्कासाठी आणि न्याय्य वेतनासाठी सुरू झालेल्या चळवळीचा हा स्मरण दिन आहे.1886 साली अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी आठ तासांच्या कामाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते, ज्याच्या स्मरणार्थ हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
कामगार दिनाचा इतिहास
1886 साली कामगारांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र येत अन्यायाविरोधात आवाज उठवला. त्यावेळी अनेक कामगारांना दिवसाचे 15-16 तास काम करायला लावले जात होते, मात्र त्याच्या मोबदल्यात ना पुरेसा पगार मिळायचा, ना सुट्टी. या परिस्थितीला कंटाळून कामगारांनी एकत्र आंदोलन केलं आणि आठ तास कामाचा दिवस, योग्य वेतन व सुट्टी यांची मागणी केली. या लढ्याचं प्रतीक म्हणून 1989 मध्ये मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसने एक ठराव मंजूर केला. या ठरावात कामगारांसाठी दिवसातील 8 तासांपेक्षा अधिक काम न करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर कामगारांच्या संघर्षाची आठवण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांना सन्मान देण्यासाठी दरवर्षी 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून जगभर साजरा केला जाऊ लागला.