‘फ्युचर सिटी’ पिंपरी-चिंचवडमध्ये मोशी येथील पीएमआरडीएच्या जागेत ‘मेडिसिटी’ प्रकल्प विकसित करावा. – आमदार महेश लांडगे

पिंपरी-चिंचवड (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)मेडीसिटी प्रकल्प विकासासाठी आमदार लांडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी केली आहे. त्यासाठी दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या 30 लाखांच्या घरात आहे. शहराचे नागरीकरण आणि विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत असून, 2045 मध्ये 50 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले शहर म्हणून पिंपरी-चिंचवड नावारुपाला येणार आहेपुणे जिल्ह्यातील उत्तर भागात खेड, आळंदी, मंचर, शिरुर, जुन्नर या भागातून पिंपरी-चिंचवडमध्ये नोकरी व व्यावसायाच्या निमित्ताने येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. मुंबई-पुणे जुना व नवीन महामार्ग आणि श्रीक्षेत्र देहू व आळंदी यांच्या मध्यावर असलेल्या पिंपरी-चिंचवडची पुणे-नगर, पुणे-नाशिक, पुणे-मुंबई अशी ‘कनेक्टिव्हीटी’ महत्त्वपूर्ण ठरते.उद्योगनगरी, मेट्रो सिटी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आता मेडीसिटी प्रकल्प विकसित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय सेवा आणि संशोधन क्षेत्रातही शहराची लौकीक वाढणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.मोशी येथील पीएमआरडीएच्या मध्यवर्ती जागेत ‘फ्युचर सिटी’ पिंपरी-चिंचवडसाठी ‘मेडीसिटी प्रकल्प’ विकसित करणे शक्य आहे. त्या अनुशंगाने पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक नियोजित करावी, अशी विनंतीही मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे. दरम्यान, पीएमआरडीएच्या प्रशासकीय पातळीवर मेडीसिटीबाबत जागा निश्चितीकरीता सर्च मोहीम सुरू करण्यात येणार आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गाव मोशी आणि परिसरात अशी मेडीसिटी विकसित झाल्यास शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार आहे.पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण व राज्य सरकारच्या माध्यमातून ‘रिंग रोड’ही प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर ‘फ्युचर सिटी’ पिंपरी-चिंचवडमध्ये मोशी येथील पीएमआरडीएच्या जागेत ‘मेडिसिटी’ प्रकल्प विकसित करावा. ज्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि उपचार सुविधा निर्माण होईल.

Latest News