भारताच्या एअर स्ट्राईकला आम्ही विसरणार नाही- पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
80 विमानांच्या मदतीने झालेल्या या एअर स्ट्राईकला आम्ही विसरणार नाही,” असंही ते म्हणाले.भारताच्या निर्णायक एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतावर निशाणा साधत संसदेत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी भारताच्या कारवाईला ‘आमची मजाक उडवली’ असल्याचं म्हटलं आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मध्यरात्री पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) असलेल्या दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक (Air Strike) करत मोठी कारवाई केली.
या कारवाईत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा अंदाज आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच गोंधळ उडाला असून पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विभागाची उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.
या बैठकीला लष्करप्रमुखांसह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्री उपस्थित होतेया बैठकीत भारताच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि त्यावर संभाव्य उत्तर काय असू शकतं याबाबत विचारमंथन झालं.
बैठकीनंतर शरीफ यांनी संसदेत बोलताना भारतावर टीका केली. “भारताने केवळ आमच्यावर हल्ला केला नाही, तर संपूर्ण पाकिस्तानची मजाक उडवली आहे,” असं त्यांनी म्हटलं.
शरीफ यांनी भारतीय एअर स्ट्राईकनंतर संसदेत दिलेल्या भाषणात दावा केला की, “भारताने आमच्या नीलम आणि नौसेरी धरणांवर बॉम्ब टाकले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.” याबाबत अद्याप भारताकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पाकिस्तानकडून हे दावे करण्यात येत असले तरी त्यांनी याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप सादर केलेले नाहीत
दुसरीकडे, भारताच्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रीत करत 9 ठिकाणी हल्ले करण्यात आले.