निवडणूक तोंडावरती असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शहारातील नेतृत्व बदलण्याची वेळ…


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
दीपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्र सादर केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षातील वरिष्ठांकडे सूपूर्त केला आहे. यामुळे पुण्यातील शहराध्यक्ष पदासाठी काही नाव चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
यासंदर्भात बुधवारी मुंबईत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली.या बैठकीत आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या नावांसह अन्य नावांची चर्चा करण्यात आली.
तसेच पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांना शहराध्यक्षपदी बढती द्यावी का याबाबत देखील पक्षाने विचार केला आहे. येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत
. त्यामुळे निवडणूक तोंडावरती असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शहारातील नेतृत्व बदलण्याची वेळ आली आहेआगामी काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे.
मात्र, नुकताच या निवडणुकांच्या आधी पुण्यात एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे सूपूर्त केला आहे. यामुळे आता पक्षाचा पुण्यातील अध्यक्ष कोण होणार? याची चर्चा होताना दिसत आहे
आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या नावांसह माजी महापौर दत्ता धनकवडे आणि माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या नावांची चर्चा करण्यात आली.
तसेच पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांची शहराध्यक्षपदी बढती द्यावी, असा देखील पक्षाचा विचार आहे.
यामुळे यापैकी कोणाला संधी मिळणार हे महत्वाचे असणार आहे.