चाकण एमआयडीसी मध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपी अटक


पिंपरी(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
पिंपरी परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (13 मे) ला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चाकण परिसरातील मेदनकरवाडी येथे घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी रात्री आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रात्रपाळीत कामासाठी कंपनीत निघाली होती. या वेळी आरोपीने तिचा पाठलाग करून खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला.
त्यानंतर जबरदस्तीने तिला ओढत नेत निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली
. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.आरोपी महिलेला तोंड दाबून निर्जनस्थळी नेत असताना तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला.
आरोपीचा चावाही घेतला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. मग तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषाच्या मदतीने पीडिताने चाकण पोलिसांना याबाबत कळवलं.
महिलेवर सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून नराधम प्रकाश भांगरेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात आणि पकडण्यात चाकण पोलिसांना यश आलं. तो सध्या मेदनकरवाडीमध्ये राहायला आहे,
मात्र तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
त्याने याआधी असे काही कृत्य केलंय का? याचा तपास ही केला जात आहे.