महायुती म्हणून लढण्याचा आमचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

devendra-fadanvis

(पुणे :ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.अशातच व्यापाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन देत पाठिंबा दर्शवला आहे.

येत्या निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, काही अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगळं लढू शकतो. कारण ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे जिथे युती शक्य नाही तिथे आम्ही वेगळं लढू. त्याठिकाणी एकमेकांवर टीका न करता सकारात्क पद्धतीने लढण्याचा आमचा प्रयत्न राहील,

-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला होता. त्यामुळे तर्की विरोधात संतापाची लाट उसळून आली आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंद खरेदी बहिष्कार घालत खरेदी थांबवली होती. यानंतर पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे कॅाल आणि व्हॅाटसॅप मेसेज आले होते.

यानंतर एकच खळबळ उडाली होती. गेल्या काही वर्षांपासून रखडेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत.

तसेच राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात अधिसूचना जारी करावी, असे देखील सांगितलं आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मोठं विधान केलं आहे.

यामुळे आता निवडणुका कधी होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आ्हेयासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,

”स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका वेळेत पूर्ण व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाने तयारीही सुरु केली आहे. पण हे दिवस पावसाचे आहे, अशावेळी ज्या ठिकाणी पाऊस जास्त असेल त्याठिकाणी अतिरिक्त वेळ मिळावा, अशी आमची मागणी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Latest News