भाजपा पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी शत्रुघ्न काटे आणि पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे निवड

पुणे:  (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राज्य निवडणूक अधिकारी चैनसुक संचेती यांनी ही अधिकृत घोषणा केली.

भारतीय जनता पक्षाने राज्यातील प्रमुख शहरांतील शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पुणे शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा धीरज घाटे यांची निवड करण्यात आली आहे. श्रीनाथ भिमाले, माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह अन्य इच्छुकांनीही या पदासाठी प्रयत्न केले होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी पुन्हा घाटे यांच्यावर विश्वास दाखवला आहे

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर होईल. मागील निवडणुकीत १०० हून अधिक नगरसेवक निवडून आले होते. यावेळी ही संख्या वाढेल,” असा विश्वास धीरज घाटे यांनी व्यक्त केला आहे.

महायुतीच्या पार्श्वभूमीवर भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार की आघाडी करणार, याबाबत विचारले असता, त्यांनी स्पष्ट केले की, “या संदर्भात अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील.”माध्यमांशी बोलताना काटे म्हणाले

की, “आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप पूर्णपणे सज्ज आहे. पक्षनेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.

राज्यभरात भाजपच्या संघटनात्मक जिल्ह्यांसाठी एकूण ५८ जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांसाठी शत्रुघ्न काटे यांचा नेहमीच विचार होत आला आहे

. मात्र, काही काळ त्यांना संधी नाकारली गेली होती. अखेर पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.

. माध्यमांशी संवाद साधताना घाटे म्हणाले, “गेल्या दोन वर्षांत लोकसभा, विधानसभा आणि सदस्य नोंदणी मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली. हे यश संघटनाच्या ताकदीमुळेच शक्य झाले.“

Latest News