वैष्णवीने आत्महत्या की हत्या? पोलिसांसमोर मोठे आव्हान…


(पुणे :ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
शवविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे, तसेच तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, याचा तपास करणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे
मुळशी तालुक्यातील भूकुम येथे १६ मे रोजी वैष्णवी शशांक हगवणे हिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.
वैष्णवीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे या प्रकरणाचा हत्येच्या दिशेने तपास करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून सत्य समोर येईल राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिच्या शवविच्छेदन अहवालामुळे तिच्या मृत्यूचे गूढ अधिक गडद झाले आहे.
पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात वैष्णवीचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉ. जयदेव ठाकरे आणि डॉ. ताटिया यांच्या अहवालात मृत्यूचे कारण गळा आवळणे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, तिच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा आढळल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. शवविच्छेदनादरम्यान अंतर्गत अवयव आणि इतर नमुने रासायनिक तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आले आहेत,
जेणेकरून मृत्यूचे नेमके कारण आणि इतर तपशील उघड होऊ शकतील.वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात सांगण्यात येत असले, तरी तिच्या अंगावर आढळलेल्या मारहाणीच्या खुणांमुळे तिच्या नातेवाईकांनी तिची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला आहे.
पोलिसांनी वैष्णवीची सासू, नणंद आणि पती शशांक यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी करत आहेत, जेणेकरून वैष्णवीच्या मृत्यूचे सत्य लवकरच उघड होईल.
या प्रकरणी वैष्णवीच्या आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून, हुंड्यासाठी तिच्या सासरच्या मंडळींनी छळ केल्याचा आरोप केला आहे वैष्णवीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी लग्नाच्या वेळी वैष्णवीच्या कुटुंबीयांकडून ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर गाडी आणि चांदीच्या भांड्यांची मागणी केली होती. याशिवाय, मुलाच्या कुटुंबीयांनी आलिशान ठिकाणी विवाह करण्याची अटही घातली होती. या पार्श्वभूमीवर, वैष्णवीच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.