पोलिसात केलेली तक्रार मागे घे म्हणतं बायकोला लाकडी दडक्याने केली मारहांना


पोलिसात केलेली तक्रार मागे घे म्हणतं बायकोला लाकडी दडक्याने केली मारहांना
पुणे (ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना) पोलिसांमध्ये केलेली तक्रार मागे घे व मुलगा संभाळण्यासाठी दे, असे म्हणून पत्नीच्या कार्यालया बाहेर तिला लाकडाने मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एका २७ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अभिजित हनुमंत धुमाळ (वय ३०, रा. बनकर कॉलनी, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे अभिजित धुमाळ याच्याबरोबर २० मे २०२१ रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस व्यवस्थित गेले. त्यांना एक मुलगा झाला आहे. त्यानंतर मानसिक छळ करुन हुंडा मागत असल्याने फिर्यादीने सासु व पती विरुद्ध पोलीस ठाण्यात १८ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यापासून त्या आपल्या माहेरी आईवडिलांकडे राहण्यास आहे. गुन्हा दाखल केल्यापासून त्यांचा पती अभिजित धुमाळ हा नेहमी त्यांना शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करत असतो. त्याच्या विरुद्ध यापूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात दोन अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत.
त्या २३ मे रोजी कार्यालयात कामाला आल्या. तेव्हा सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कार्यालयाबाहेर अभिजित धुमाळ दिसला. आपली कार्यालयात बदनामी होऊ नये, म्हणून त्या बाहेर आल्या. त्यावेळी त्याने फिर्यादीकडे मला माझा मुलगा मला दे, माझ्या मुलास माझी आई संभाळेल, तु तुझ्या घरातील सामान घेऊन जा आणि दिलेली तक्रार माघारी घे, असे म्हणाला.
त्यावेळी त्यांना फिर्यादी यांनी मुलगा वगैरे देणार नाही आणि तक्रार देखील माघारी घेणार नाही, असे सुनावले. त्यावर त्याने तुझे इथेच तुकडे करीन, तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करु लागला
. त्याच दरम्यान तेथे पडलेले लाकुड घेऊन फिर्यादी यांच्या डोक्यात व अंगावर मारहाण करु लागला. आजू बाजूच्या लोकांनी त्यांना सोडविले. त्या खाली पडल्या होत्या. लोकांची गर्दी पाहून तो पळून गेला. औषधोपचार केल्यानंतर त्यांनी तक्रार दिली असून पोलीस हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.