भारतीय योग संस्थान खडकी जिल्हा मार्फत हड्डी रोग निवारण शिबिराचे आयोजन!

पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
भारतीय योग संस्थान खडकी जिल्हा आपलं आरोग्य आपली जबाबदारी अंतर्गत बॅडमिंटन हॉल काटेपुरम चौक पिंपळे गुरव, येथे दिनांक २६ मे ते ३० मे २०२५ या कालावधीत हड्डी रोग निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हाडांसंबंधी आजारांवर तज्ज्ञ योग शिक्षकां द्वारा आसन, प्राणायाम, ध्यान आणि मुद्रा यावर मार्गदर्शन व सल्ला दिला जाणार आहे. नागरिकांनी या आरोग्यदायी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिराला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे:
प्रमुख उपस्थिती:

  • पांतप्रधान श्री. अशोक बसेर, महाराष्ट्र
  • विभागीय प्रधान सौ. भाग्यश्री बसेर, पुणे
  • विभागीय प्रधान सौ. संजीवनी देशमुख
  • गटप्रमुख पिंपरी सौ. प्रतिभा पाटील
  • जिल्हा प्रधान श्री. रवींद्र पालकर
  • क्षेत्र प्रधान सौ.सुनीता पवार
  • उपजिल्हा प्रधान सौ.मनीषा लोंढे
    शिबिर प्रमुख: श्रीमती कांता दाराल
    उपशिबिर प्रमुख: सौ. शालिनी वाळके व सौ. चंपा चव्हाण या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान  
    क्षेत्र मंत्री सौ.आशा घावटे, क्षेत्र प्रधान सौ. मीनाक्षी खैरनार, श्रीमती इंदुताई पवार, व संघटन मंत्री सौ. सुलोचना गोळे यांनी केले आहे. हाडांचे दुखणे, सांधेदुखी, मणक्याचे विकार यांसारख्या त्रासांवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने उपचार मिळणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Latest News