३१ मे ‘आनंद तरंग – भावविश्व मनाचे ‘कार्यक्रम भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन कडून आयोजन…


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘स्वरगंध, पुणे ‘प्रस्तुत ‘आनंद तरंग – भावविश्व मनाचे’ हा कार्यक्रम शनिवार, ३१ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात हार्मोनियम व व्हायोलिनच्या सहवादनातून मनातील भावभावना या संकल्पनेवर आधारित लोकप्रिय मराठी व हिंदी गीतांचा नजराणा सादर करण्यात येणार आहे
.माधवी करंदीकर (हार्मोनियम),डॉ.नीलिमा राडकर (व्हायोलिन), अभिजीत जायदे व जितेंद्र पावगी (तबला), राजेंद्र साळुंखे (तालवाद्य) आणि डॉ.अमित करकरे (संवादक) हे कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत
सर्व रसिकांना प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत प्रस्तुत होणारा हा २४६ वा कार्यक्रम आहे.