7 दिवस उपोषण केल्यानंतर, आज मंत्री उदय सामंत यांनी सरकारच्या वतीने लेखी आश्वासन देताच त्यांनी आपला संघर्ष थांबवला.

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) – आज मंत्री उदय सामंत बच्चू कडू यांच्या भेटीस पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने एक पत्र सादर केलं. या पत्रात स्पष्ट करण्यात आलं की, पंधरा दिवसांच्या आत कर्जमाफीसंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमली जाईल आणि त्या समितीत बच्चू कडू यांचाही समावेश असेल. समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार आहे.उदय सामंत यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्याशी यासंदर्भात मी प्रत्यक्ष चर्चा केली असून, बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य करण्याच्या प्रक्रियेला सरकार सकारात्मक आहे.”शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अखेर आपलं अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं आहे. सलग सात दिवस उपोषण केल्यानंतर, आज मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सरकारच्या वतीने लेखी आश्वासन देताच त्यांनी आपला संघर्ष थांबवला.सात दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात, सरकारने सुरुवातीला मौन बाळगले होते. मात्र काल अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrshekhar Bawankule) यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्याशी थेट फोनवरून संवाद साधला. त्यानंतर, सरकारकडून समिती स्थापन होणार असल्याचं कडून सांगण्यात आलं, पण अद्याप तारखा न ठरल्यामुळे बच्चू कडू आंदोलनावर ठाम राहिले होते.

उपोषण मागे घेताना बच्चू कडू यांनी सरकारला एक स्पष्ट इशारा दिला आहे. “२ ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख जाहीर झाली नाही, तर आम्ही थेट मंत्रालयात घुसू,” असा इशारा त्यांनी दिला.तसेच, “मुख्यमंत्री आता तरी कर्जमाफीवर बोलायला लागलेत, हेच मोठं यश आहे. ९० टक्के मागण्या मान्य झाल्या असून दिव्यांगांबाबतच्या २० मागण्या सुद्धा मान्य करण्यात आल्या आहेत,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
