माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे बहुचर्चित निवडणूकी मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मारली बाजी


(पुणे :ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)-
साखर कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार आणि शरद पवार यांचे सहकारी चंद्रराव तावरे आणि शेतकरी संघटनेचे चार पॅनल तयार मैदिनात आहेत.
या कारखान्यांमध्ये ११,११०,००० अधिक मतदार आहेत. निवडणुकीत ८८.४८ टक्के मतदान झाले. आज मतदार निवडणूक लढवणाऱ्या नवीन उमेदवारांमधून २१ संचालकांची निवड करतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: निवडणुकीच्या मैदानात आहेत. अजिव पवारांच्या नेतृत्वाखाली नीलकंठेश्वर पॅनल, शरद पवार आणि युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा बचाव पॅनल, चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनल आणि शेतकरी संघाच्या नेतृत्वाखालील सदकारी शेतकरी पॅनल अशी पॅनेल्स मैदानात उतरले आहे.
पहिल्यांदा मतमोजणी झालेल्या ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात होते, तिथे त्यांचा मोठा विजय झाला आहे.
ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार सुरवातीपासून आघाडीवर होते. 102 पैकी 101 मतं वैध होती, यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनी (Ajit Pawar) बाजी मारली आहे.
बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे बहुचर्चित निवडणूकीची मतमोजणी आज पार पडली
.साखर कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवार यांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे आणि शेतकरी संघटनेचे चार पॅनल रिंगणात आहेत.
आता या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. १०२ मतांपैकी १०१ वैध होते, त्यापैकी अजित पवार यांना ९१ मते मिळाली. १९ हजार ५४९ गटातील एकूण १७ हजार २९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
दुसऱ्या गटात ९९.०२ टक्के मतदान झाले. १०२ मतदारांपैकी ९९ पुरुष आणि २ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवार विजयी झाले आहेत
.मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार ८८.४८ टक्के मतदान झाले, त्यापैकी १२ हजार ८६२ पुरुषांनी मतदाने केले. तर ४ हजार ४३४ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.