यंदाचा पावसाळा अधिक असल्यान प्रशासन अलर्ट मोडवर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचना

पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते

पुणे जिल्ह्यात पुणे महापालिका हद्दीत १५ , भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण २२ , महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ २, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ १ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत २ असे एकूण ४२ ब्लॅकस्पॉट आहेत. रस्ते सुरक्षतितेच्यादृष्टीने या ठिकाणी लघुकालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक असून, अशा ठिकाणी जाण्यास प्रतिबंध किंवा ठराविक कालावधीसाठी निर्बंध लादण्याची गरज आहे.

याचबरोबर येथे  दिशादर्शक फलक लावणे, राडारोडा साफ करणे, बॅरिकेटींग आदी उपाययोजना करणे जरूरी असून, या उपाययोजनांची पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी करुन येत्या १ महिन्यात अहवाल सादर करावा असे त्यांनी सांगितले

.रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण लक्षात घेता अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता जिल्ह्यात रस्ते सुरक्षा विषयक आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच जिल्ह्यातील अपघाताच्या ठिकाणांची (ब्लॅकस्पॉट) व्यापक स्वरुपात जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी दिल्या

.मागील एका वर्षात जिल्ह्यात झालेल्या अपघाताची ठिकाणनिहाय कारणे शोधावीत.

यंदा मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात लवकर झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

. गेल्या वर्षी पुण्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. या पाण्यामुळे येथील नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला होता.

लोकांच्या घरात पाणी शिरले होते. अनेक वाहने पाण्यात वाहून गेली होती. मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होते. यंदाचा पावसाळा अधिक असल्याने आता प्रशासन अलर्ट मोडवरून आले आहे. तशा सचूना पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

याअनुषंगाने सर्व संबंधित विभागाला सुरक्षात्मक उपाययोजना सूचना कराव्यात, याचे पालन सर्व संबधित यंत्रणांनी करावे. परिणामी जिल्ह्यातील इतर ठिकाणी याचा उपयोग होईल

. खडकवासला धरण चौकातील वाहतूक कोंडी टाळण्याकरीता वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी असे सांगून डुडी यांनी, रस्ते सुरक्षा जनजागृतीकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी बहीर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अंतर्गत करण्यात आलेल्या कामाबाबत माहिती दिली.

Latest News