मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची एक चाचणी : राज ठाकरे

(मुंबई :ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) –

आम्ही या हिंद प्रांतावर सव्वाशे वर्षे राज्य केले. गुजरात, पंजाब, मध्यप्रदेश ते अटकेपार आमचे साम्राज्य पोहोचले, पण आम्ही कधी मराठी भाषा इतरांवर लादली का? हिंदी ही तर अवघ्या २०० वर्षांपूर्वीची भाषा आहे, महाराजांच्या काळात ती नव्हतीच. मग ही सक्ती कशासाठी आणि कोणासाठी? मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची एक चाचणी असल्याचा गंभीर आरोपही राज ठाकरे यांनी केला.

“हे फक्त भाषेला डिवचून महाराष्ट्राची प्रतिक्रिया तपासत आहेत. महाराष्ट्र शांत राहिला, तर ते पुढचे पाऊल टाकतील,” असे ते म्हणाले. “कुणाची माय व्यालीय, त्यांनी महाराष्ट्राला किंवा मुंबईला हात लावून दाखवावा. आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही गांडू नाही आहोत,” अशा खणखणीत शब्दांत त्यांनी विरोधकांना इशारा दिला

आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, त्यांचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, मात्र एका भाषेची सक्ती अमान्य आहे. “एक भाषा, एक लिपी उभी करायला अनेक वर्षे लागतील,” असे ते म्हणाले.

अमित शाह यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले, “अमित शाह म्हणाले की ज्यांना इंग्रजी येते, त्यांना इंग्रजी येत असल्याची लाज वाटेल. तुम्हाला नाही येत ना…” अशा शब्दांत त्यांनी शाह यांच्यावर निशाणा साधला.

शिवसेना आणि मनसेच्या ऐतिहासिक संयुक्त मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली.

पाचवी नंतर हिंदीची सक्ती करून मुलांना काय हिंदी चित्रपटसृष्टीत पाठवायचे आहे का?” असा संतप्त सवाल करत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही थेट टोला लगावला