जुन्या आणि धोकादायक इमारती पाडताना, महापालिकेने ठोस व कठोर नियम तयार करावे:मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभू


(पुणे :ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) –
पुण्यातील मध्यवर्ती भाग तसेच अनेक इमारती वाड्यांचे पुनर्बांधणी काम वेगाने सुरू आहे. मात्र जुन्या आणि धोकादायक इमारती पाडताना कोणती प्रक्रिया पाळावी, याबाबत स्पष्ट नियमावली नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे
. त्यामुळे महापालिकेने ठोस व कठोर नियम तयार करावेत, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) केली आहे.मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन ही मागणी सादर केली.
यावेळी प्रविण झेंडे, यश वारवटकर, प्रशांत भोलागीर, अशोक गवारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पुनर्विकासाच्या नावाखाली सर्रास सुरु असलेल्या पाडकामांमुळे नागरिकांचे जीवन अस्थिर झाले असल्याचे मनसेने सांगितले.
सध्या महापालिकेकडे नवीन इमारतींसाठी बांधकाम परवानग्यांची विस्तृत प्रक्रिया आहे. मात्र, जुन्या इमारती पाडताना कोणतेही स्पष्ट धोरण नसल्याने अपघात, प्रदूषण आणि सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
तांत्रिक व संरक्षक उपाय न करता पाडकाम केल्याने शेजारच्या इमारतींचे नुकसान होते, तसेच धुळीमुळे वृद्ध व लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे संभूस यांनी निदर्शनास आणून दिले.
अवैध एजन्सी आणि राजकीय हस्तक्षेपामुळे ही कामे मनमानी पद्धतीने होतात, त्यामुळे अशा पद्धतीने सुरु असलेली पाडकाम प्रक्रिया महापालिकेने थांबवावी व ठोस नियम तयार करूनच परवानग्या द्याव्यात, अशी आग्रही भूमिका मनसेने घेतली आहे.
मनसेने महापालिकेकडे खालील ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे: – इमारत पाडण्यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व वाहतूक पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेणे सक्तीचे करावे.