पुणे महापालिकेच्या रस्ते दत्तक योजनचे ’ उदघाटन आयुक्त नवल किशोर राम यांचे हस्ते संपन्न

ps-logo-rgb-12

पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

पुणे महानगरपालिका, उप आयुक्त परिमंडळ क्र. १ कार्यालयाकडील ‘ रस्ते दत्तक योजना’ उदघाटन समारंभ बुधवार रोजी आयुक्त नवल किशोर राम यांचे हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी अति.महा आयुक्त व विविध विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते

पुणे महानगरपालिका रस्ते दत्तक योजने अंतर्गत महानगरपालिकेतील अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते NGO यांच्या कडे विविध रस्त्यांचे पालकत्व देण्यात आलेले असून, नेमून दिलेल्या रस्त्यांवरील मुलभूत गोष्टी जसे फुटपाथ चालण्यायोग्य असणे, रस्ते खड्डे मुक्त तसेच फुटपाथवरील अतिक्रमण, फ्लेक्स, बॅनर, पाणी साठणारी ठिकाणे, इंटरनेटच्या लटकणाऱ्या केबल, रस्त्यावरील ड्रेनेज व पावसाळी चेंबर समपातळीत असणे, दुभाजक दुरुस्ती व पेंटिंग, झेब्रा क्रॉसिंग, दुभाजाकामधील सुशोभीकरण, रस्त्याचे बाजूस झाडांच्या धोकादायक फाद्यांचा विस्तार कमी करणे, दैनदिन साफ सफाई व राडारोडा अशा प्रकारच्या २९ बाबींची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागाकडून पूर्तता करून घेणे समाविष्ठ आहे

. या उपक्रमामध्ये त्याच परिसरातील नागरिकांचा सहभाग असल्याने रस्त्याचे बाबतीत वरील बाबींची तपासणी नियमित होणार आहे. रस्त्यांची तपासणी झाल्यानंतर आढळून येणाऱ्या त्रुटी तातडीने निकाली काढणे, सर्व संबधित अधिकाऱ्यांना सूचना देणाऱ्या आल्या आहेत. सर्व त्रुटी वेळेत पूर्ण होतील यासाठी संबधित नागरिक,

मनपा सेवक यांनी पाठपुरावा करून कामे करून घ्यायची आहेत. यासाठी ४५ मनपा अधिकारी,सेवक व ४५ नागरिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदरचे काम अधिकारी व नागरिक हे स्वयंस्फूर्तीने करणार आहेत. त्यामुळे रस्ते फुटपाथ नागरिकांना वापरण्यास सुस्थितीत राहतील अशी अपेक्षा आहे.

यावेळी कार्यक्रमासाठी  एम. जे. प्रदीप चंद्रन अति. महा. आयुक्त (ज) , ओमप्रकाश दिवटे अति, महा. आयुक्त (वि),  अनिरुद्ध पावसकर मुख्य अभियंता पथ, संदीप कदम  उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग,  संदीप खलाटे, उप आयुक्त अतिक्रमण,  बल्लाळ उप आयुक्त परिमंडळ क्र ५ व थोरात उप आयुक्त परिमंडळ क्र ४, व सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.

तसेच श्री ज्ञानेश्वर मोळक, डॉ.  सिद्धार्थ धेंडे, श्रीमती कमल ढोले पाटील,  श्यामला देसाई,  कनिज सुखराणी,  वनिता वागस्कर,  लता राजगुरू व अश्विनी लांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे नियोजन  माधव जगताप, उप आयुक्त परिमंडळ क्र १ कडून करण्यात आले होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विवेक देव यांनी केले.प्रायोगीक तत्वावर परिमंडळ क्र. १ अंतर्गत तिन्ही क्षेत्रीय कार्यालयाकडील रस्त्यांची प्राथमिक निवड व नेमणूक करण्यात आलेली असून ९० मनपा अधिकारी, सेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते नागरिक यांनी समन्वयाने कामकाज करून प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणारा ‘रस्ते दत्तक योजना’ अभियान यशस्वी करण्याबाबत मा. महापालिका आयुक्त  नवल किशोर राम यांनी सूचना केल्या आहेत

Latest News